Amravti Shocker: कामावरून घरी जात असताना महिला पोलीस कर्मचाऱ्यावर काळाचा आघात, अमरावती येथील हृदयद्रावक घटना

अमरावती जिल्ह्यात एका गर्भवती महिला पोलीस कर्मचाऱ्याचा अपघात झाला आहे. या घटनेत तीचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे.

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Amravti Shocker: अमरावती (Amravati) जिल्ह्यात एका गर्भवती महिला  पोलीस कर्मचाऱ्याचा अपघात झाला आहे. या घटनेत तीचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. शनिवारी मध्यरात्री कामावरून घरी परतत असताना महिला पोलीस कर्मचाऱ्यावर घात झाला. महिला आठ महिन्यांची गर्भवती (Pregnant)  होती, पाठीमागून येऊन बाईकने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. पोलीसांनी या प्रकरणात बाईक चालकाला अटक केली आहे. शहरात या घटनेमुळे मोठी शोककळा पसरली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका शिरसाट असं या अपघातात मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. शनिवारी प्रियंका ड्यूटी करून आपल्या पती सोबत बाईक वरून घरी जात होत्या. गावातील गाडगे नगर मंदिर परिसरात भर धाव बाईक पाठीमागून आली आणि बाईकने प्रियंका यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. या अपघातात ती आणि तीचा पती बाईक वरून खाली पडले. तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तीला स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारा दरम्यान तीचा मृत्यू झाला. सोबत तीचा गर्भ देखील मरणं पावले.  याशिवाय पतीवर उपचार सुरु आहेत. आरोपी दुचाकी चालक गौरव मोहोड याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पोलिस विभागात देखील मोठी शोककळा पसरली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement