COVID 19 लढ्यातील आरोग्य सेवकांसाठी 'ही' मागणी करत अमित ठाकरे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र, वाचा सविस्तर

त्यासाठी अमित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना (CM Uddhav Thackeray) यांना रीतसर पत्रातून आवाहन केले आहे.

Amit Thackeray, Chief Minister Uddhav Thackeray | (Photo credit: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात कोरोनाचे (Coronavirus In Maharashtra) 37 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. आतापर्यंत 1 हजारांहून जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या संकट काळात आरोग्य कर्मचारी, पोलीस, प्रशासकीय अधिकारी हे जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करत आहेत.  या कोरोना संकटकाळात आर्थिक मदतीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांची वेतन कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र आता या सरकारी कर्मचाऱ्यांसोबत आरोग्य कर्मचारी आणि पोलीस यांच्याही मानधनात सरकार कपात करण्याचा विचार करत आहे. जे लोक कोरोना योद्धा म्ह्णून आपल्या जीवाची बाजी लावत आहेत त्यांच्या वेतनात कपात करणे हे चुकीचे ठरेल त्यामुळे सरकारने आपला विचार बदलवा अशी मागणी मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray)  यांनी केली आहे.  त्यासाठी अमित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना (CM Uddhav Thackeray) यांना रीतसर पत्रातून आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनाही हे पत्र पाठवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संदर्भातील सविस्तर अपडेट्स जाणून घ्या एका क्लिक वर

अमित ठाकरे यांनी पत्रात म्हंटल्याप्रमाणे, "कोरोनामुळे निर्माण झालेल्या वैद्यकीय आणीबाणीच्या काळात ‘डॉक्टर हेच देव’ असल्याचा आपल्याला अनुभव येत आहे. विशेषत: राज्यातील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचे कितीही आभार मानले तरी ते अपुरेच ठरतील. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या मानधनात कपात करणे कुठल्याही दृष्टीने पटणारे नाही . खरं तर सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या सेवेचं मोलच होऊ शकत नाही इतकी मेहनत ते करत आहेत. त्यांच्या परिश्रमाच मोल त्यांना अधिक भत्ता देऊन करायला हवं, मानधन कमी करून नाही. Coronavirus: शरद पवार यांनी कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्याबाबत सरकारला दिला ट्विटरवरुन सल्ला

मनसे ट्विट

प्राप्त माहितीनुसार, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आरोग्य सेवा आयुक्तालयानं 20 एप्रिलला काढलेल्या आदेशानुसार बंधपत्रिक वैद्यकिय अधिकाऱ्यांचे मानधन 55 ते 60 हजार इतकं निश्चित केलं आहे. त्याआधी हेच मानधन 87 हजार इतकं मिळत होतं. नव्या आदेशानुसात सुमारे 20 हजार रुपये कपात होणार आहे. निदान डॉक्टरांच्या तरी मानधन कपात करू नये, कारण असे करणे हे अन्यायकारक ठरेल असेही अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.