कोरोना व्हायरस दहशतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोद्धा दौरा कार्यक्रमामध्ये बदल; शरयू नदीवर आरती रद्द

दरम्यान उद्धव ठाकरे लखनौ विमानतळावर उतरून अयोद्धेला पोहचणार आहेत.

Shiv Sena Chief Uddhav Thackeray | (Photo Credit: You Tube)

महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोद्धेला जाणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार उद्या (7 मार्च) दिवशी अयोद्धेला जाणार आहेत. दरम्यान त्यांच्या अयोद्धा दौर्‍यावर करोना व्हायरसचं सावट आहे. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या अयोद्धा दौर्‍यातील कार्यक्रमामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश सरकारच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौर्‍यातील शरयू नदीवरील आरतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. तर उद्धव ठाकरे लखनौला उतरून खाजगी वाहनाने अयोद्धेला पोहचणार आहे. आज एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. काल राऊतांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे.

दरम्यान संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातून सुमारे 2-3 हजार शिवसैनिक अयोद्धेमध्ये दाखल होणार आहेत. रामलल्लांच्या दर्शनासाठी कॉंग्रेस नेत्यांनीदेखील अयोद्धेमध्ये यावे असे संजय राऊत म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या 7 मार्चच्या प्रस्तावित अयोद्धा दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी घेतली UP मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट.  

कसा असेल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अयोद्धा दौरा कार्यक्रम

दरम्यान यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी 10 शिवसेना खासदारांसोबत जाऊन रामलल्लांचे दर्शन घेतले होते. तर आताही महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल आणि पुढील 15 वर्ष ही युती कायम राहील असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान कोरोना व्हायरासच्या पार्श्वभूमीवर उत्तरभारतामध्ये होली मिलन कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी,  गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अरविंद केजरीवाल यांनीदेखील होळी निमित्त कार्यक्रम रद्द केले आहेत.