Dahi Handi 2021: दहीहंडी साजरी करण्यावर राज्य सरकारचे निर्बंध असताना मनसे, BJP 'सेलिब्रेशन' वर ठाम

काही दिवसांपूर्वी राज्य टास्क फोर्स सोबत झालेल्या बैठकीमध्ये दहीहंडी उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा केला जाऊ शकत नाही असा निर्णय झाला आहे.

Dahi Handi (Photo Credits: Flickr, Wikipedia)

महाराष्ट्रामध्ये आता कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका पाहता गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पण कृष्ण जन्माष्टमी आणि दहिहंडी (Dahi Handi) सणामध्ये या कोविड 19 नियमावलीला धाब्यावर बजावत महाराष्ट्र भाजपा (Maharashtra BJP) आणि मनसे (MNS) कडून दहीहंडी साजरी केली जाणार असल्याचं जाहीर करण्यात आले आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये त्याच अनुषंगाने तयारी देखील सुरू झाली आहे. राज्य सरकारला हिंदू सणांवर निर्बंध घालून काय मिळणार आहे? असा सवाल विचारला जात आहे.

दरम्यान ठाण्यात मनसे कडून आयोजित दहिहंडी उत्सवाची तयारी पहाण्यासाठी नुकतीच मनसे नेते बाळ नांदगांवकर यांनी हजेरी लावली होती. त्यांनी परिस्थितीचा आढावा देखील घेतला आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना आणि कमीत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये यंदा दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. पण दुसरीकडे पोलिसांकडून अशाप्रकारे दहीहंडी उत्सव साजरी करण्यांवर कारवाई होण्याची चिन्हं आहेत.

मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ट्वीट करत दहीहंडी यंदा साजरी होणारच असा ठाम विश्वास व्यक्त करत कितीही बंधने घातली, गुन्हे दाखल केले तरी दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठामपणे उभी राहील. सरकारला फक्त मराठी सणांमध्येच कोविड दिसतोय असे म्हणाले आहे.

अविनाश जाधव ट्वीट

मनसे प्रमाणे भाजपा नेते राम कदम यांनी देखील ट्वीट करत राज्य सरकारावर निशाणा साधत दहीहंडी साजरी करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

राम कदम ट्वीट

(नक्की वाचा: Ram Kadam on Dahi Handi Celebration: हिंदू सणांना विरोध का? दहीहंडी करणारच; राम कदम यांचा राज्य सरकारला इशारा).

काही दिवसांपूर्वी राज्य टास्क फोर्स सोबत झालेल्या बैठकीमध्ये दहीहंडी उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा केला जाऊ शकत नाही असं म्हणाले आहेत. दहीहंडी प्रमाणे आगामी गणेशोत्सव देखील साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारचं आहे.