MAH MCA CET 2020 Exam कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे 28 मार्च ऐवजी 30 एप्रिलला; mahacet.org जाणून घ्या अधिक माहिती
दरम्यान विद्यार्थींनी नवं नोटिफिकेशन संकेतस्थळावर पाहण्याचं आवहन करण्यात आलं आहे.
MAH MCA CET 2020 Exam Date: कोरोना व्हायरसचं जागतिक संकट आता जगभरात थैमान घालत आहे. दरम्यान चीनमधून सर्वत्र पसरलेला हा COVID-19 आजार आटोक्यात आणण्यासाठी आता सरकार आणि आरोग्य प्रशासनाकडून कठोर पाऊलं उचलली जात आहेत. दरम्यान सध्या या आजाराला रोखण्यासाठी गर्दी टाळली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा 31 मार्च पर्यंत न घेण्याचे आदेश सरकारकडोऔन देण्यात आले आहेत. दरम्यान महाराष्ट्रात होणारी State Common Entrance Test Cell (CET) ची 28 मार्च परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. mahacet.org या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर MAH MCA CET 2020 exam नव्या वेळापत्रकानुसार, 30 एप्रिलला होणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी नवं नोटिफिकेशन संकेतस्थळावर पाहण्याचं आवहन करण्यात आलं आहे.
MAH-MCA-CET 2020 ही परीक्षा 30 एप्रिलला होणार असून त्याबबतची अधिक माहिती लवकरच दिली जाईल असं सांगण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी या परिक्षेची अॅडमीट कार्ड संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहेत मात्र येत्या काही दिवसांतच त्याची लिंक देखील अॅक्टिव्ह केली जाईल. Maharashtra CET ही परीक्षा अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमासाठी राज्य शासनाकडून घेतली जाते. ऑब्जेक्टीव्ह प्रकारातील प्रश्नांची ही परीक्षा असून यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक बरोबर उत्तराला 2 गुण तर चुकलेल्या उत्तराचे प्रत्येकी 0.5 मार्क कापले जातात. यामध्ये पात्र विद्यार्थ्यांना Master in Computer Applications (MCA)या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाणार आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर MPSC च्या परिक्षा पुढे ढकलण्याची राज्य सरकारकडून सुचना.
सध्या महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे 42 रूग्ण असून त्यांच्यावर मुंबई, पुणे, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यात स्थानिक रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. काल (17 मार्च) दिवशी मुंबईच्या कस्तुरबा रूग्णालयात एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. दरम्यान हा जीवघेणा आजार टाळण्यासाठी नागरिकांना पुढील काही दिवस सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.