Coronavirus In India: HDFC, ICICI, Kotak बॅंकेच्या वेळेत बदल; ऑनलाईन बॅंकिंग चा पर्याय निवडण्याचं आवाहन

दरम्यान बॅंक ही सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेतच सुरू राहील. तरीही ग्राहक ऑनलाईन माध्यामातून त्यांचे आर्थिक व्यवहार चोवीस तास करू शकतात असे सांगण्यात आले आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्रासह देशात कोरोना व्हायरसचं वाढतं संकट पाहता आता लॉकडाऊनचे आदेश जारी करण्यात आले आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सार्‍या सुविधा बंद करण्यात आल्या आहे. महाराष्ट्रात संचारबंदीचे आदेश देण्यात आले असले तरीही अत्यावश्यक सेवांमध्ये आर्थिक व्यवहार, बॅंक सुरू राहणार आहे. मात्र महराष्ट्रात HDFC, ICICI, Kotak बॅंकेकडून मार्फत त्यांच्या कार्यकालीन वेळेमध्ये बदल करण्यात आले आहेत. दरम्यान बॅंक ही सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेतच सुरू राहील. तरीही ग्राहक ऑनलाईन माध्यामातून त्यांचे आर्थिक व्यवहार चोवीस तास करू शकतात असे सांगण्यात आले आहे. केवळ अत्यावश्यक कामांसाठी बॅंकेमध्ये यावं असे आवाहन देखील करण्यात येत आहे. सध्या देशभरात कोरोनाचं संकट गंभीर होत असल्याने आता मुंबई शहरामध्येही मुंबई लोकल ट्रेन्स बंद करण्यात आल्या आहेत. तर बस सेवा केवळ अत्यावश्यक सेवेसाठी असतील. रिक्षामध्ये केवळ एक प्रवासी आणि टॅक्सीमध्ये चालकासह 2 जण अशी मर्यादा असल्याने अनेक बॅंका किमान कर्मचार्‍यांसह सुरू ठेवल्या आहेत. दरम्यान या नव्या वेळा सध्या 31 मार्च असल्याचं सांगण्यात आलं आहे. Coronavirus Pandemic: भारतामध्ये Small Pox,Polio प्रमाणेच 'कोरोनाचं संकट' थोपवणाची क्षमता; WHO ने व्यक्त केली 'ही' मोठी अपेक्षा.  

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 101 वर पोहचली आहे. पुणे, सातारा, सांगली, मुंबई मध्ये कोरोनाग्रस्त आहे. दरम्यान दिलासादायक वृत्त म्हणजे राज्यातील 14 दिवसांपूर्वी नोंदवण्यात आलेल्या पहिल्या काही कोरोनाग्रस्तांची स्थिती आता सुधारत असल्याने अनेकांना लवकरच डिस्चार्ज करण्यात येईल.

दरम्यान मुंबई शहरात सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत. त्यामुळे नागरिकांना घरीच बसण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सध्या बॅंकेमध्ये परदेशी चलन बदलणं आणि पासबुक अपडेटसारख्या सुविधा स्थगित करण्यात आल्या आहेत. मात्र त्याची पर्यायी सोय इंटरनेट बॅंकिंग आणि अन्य ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून करण्यात आली आहे. बॅंकेचे सारे व्यवहार एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस आणि यूपीआयसारख्या माध्यमांचा वापर करून 24X7 सुरू करण्यात आले आहेत.