Aaditya Thackeray यांचे विश्वासू Amey Ghole नाराजी कबूल; पक्षाची साथ सोडण्याबाबत दिली 'ही' प्रतिक्रिया
सारं वातावरण गढूळ केले आहे त्यांच्याबद्दल असल्याचं म्हटलं आहे.
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अमोल घोले (Amey Ghole) मागील काही महिन्यांपासून त्यांच्यासोबत दिसत नसल्याने अनेक उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. यामध्ये काल युवासेनेच्या कोअर कमिटी बैठकी मध्येही अमोल घोले यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनली होती. त्या चर्चांना उत्तर देण्यासाठी आज अमोल घोले यांनी एक पत्रकार परिषद घेत आपली काही गोष्टींबाबत नाराजी आहे पण आपण कायम आदित्य ठाकरेंसोबत राहणार असल्याचं म्हटलं आहे.
अमेय घोले यांनी आपली नाराजी वरिष्ठांवर नाही तर निर्णय प्रक्रियेमध्ये ज्यांनी आपली 'मोनोपॉली' निर्माण केली आहे. सारं वातावरण गढूळ केले आहे त्यांच्याबद्दल असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी कुणाचेही थेट नाव घेण्यावर नकार दिला आहे. आपल्या नाराजी बद्दल आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा आशावाद बोलून दाखवला आहे.
युवासेना बाळाप्रमाणे जपली आहे. आम्ही आदित्य ठाकरेंसोबत पाहिलेलं स्वप्न 100% सत्यात उतरावायचं आहे. त्यासाठी काम करण्याची तयारी आहे पण काही लोकांमुळे वातावरण बिघडत आहे. यावेळी त्यांनी आपल्याला निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं जात नसल्याने अशा ग्रुपचा भाग होण्याचा काय उपायोग? असं त्यांनी म्हटलं आहे. नक्की वाचा: Yuva Sena: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं पुढील टार्गेट आदित्य ठाकरे? शिंदे गटाकडून युवासेना कार्यकारणीची घोषणा .
पवन जाधव यांनी अमेय घोलेंच्या नाराजीबद्दल बोलताना केलेल्या ट्वीट वर प्रतिक्रिया देताना 'त्यांना आत्मपरिक्षणाची गरज आहे. 2014 साली कोणाची दार चढून, कोण तिकीटासाठी फिरत होतं, हे सगळ्यांनाच माहीत आहे. यावर मला बोलायचं नाही. असं म्हणत विषय टाळला आहे. वडाळा भागातील अमेय घोले हे नगरसेवक आहेत. त्यांनी आपल्या शाखांमधून मोठ्या प्रमाणात शपथपत्र सादर झाली, सदस्य नोंदणी झाली तरीही स्थानिक स्तरावर झालेल्या अनेक नेमणूका या मेरीट वर आधारित नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.