Whatsapp Status: व्हॉट्सअॅप स्टेटस ठरला सापळा, अंबरनाथ पोलिसांकडून चोरास अटक
पोलीसही हुशार असतात. नेमका तोच धागा पकडून त्याच्यापर्यंत पोहोचतात. अंबरनाथ येथेही असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. अंबरनाथ पोलीस (Ambernath Police) केवळ एका व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे चोरापर्यंत पोहोचले.
गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो आपल्या कृत्याचा काही ना काही पुरावा मागे सोडतोच. पोलीसही हुशार असतात. नेमका तोच धागा पकडून त्याच्यापर्यंत पोहोचतात. अंबरनाथ येथेही असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. अंबरनाथ पोलीस (Ambernath Police) केवळ एका व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे चोरापर्यंत पोहोचले. होय, व्हॉट्सअॅप स्टेटस ( Whatsapp Status) ठेवणे या चोराला इतके महागात पडले की चक्क त्याच्या हातात बेड्या पडल्या. राज आंबवले असे या व्यक्तीचे नाव आहे. सध्या त्याला पोलीस कोठडी (Police Custody) मिळाली आहे.
अंबरनाथ पोलिसांनी एका चोराला अटक केली. पाठिमागील दोन वर्षांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. दोन वर्षापूर्वी तो एका दुकानात कामाला होता. त्याने या दुकान मालकाचे 2 लाख रुपये चोरुन पोबारा केला, असा त्याच्यावर आरोप आहे. दुकान मालकाचे पैसे चोरल्यावर या पठ्याने त्या पैशातून आपल्या महिला मैत्रिणीसाठी एक आयफोन आणि टू व्हिलर विकत घेतली, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली. त्याने आपल्या सोशल मीडियावर स्टेटसचा भडीमारच केला. व्हॉट्सअॅपवर दररोज तो नवनवे स्टेटस ठेवत असे. त्यामुळे त्याच्या दुकान मालकाला संशय आला. (हेही वाचा, WhatsApp Feature Update: भारतातील युजर्ससाठी व्हॉट्सॲपचे नवे फीचर, आता चॅटींग करतानाही ऐकता येणार 'वॉयस मेसेज')
अलिकडील काळापर्यंत अगदी फाटका असलेला हा माणूस अचानक याच्याकडे इतका पैसा आला कोठून? असा संशय मालकाला आला. त्यामुळे त्यांनी अंबरनाथ पोलिसांकडे संशयाने तक्रार केली. अगरबत्ती व्यवसायीक सुनील महाडीक यांच्याकडे राज आंबवले कामाला होता. अधून मधून तो दुकानातील पैसे ठापत असे. मालक सुनील महाडीक यांना संशय आल्यानंतर त्यांनी त्याला कामावरुन काढून टाकले.
दरम्यान, सुनील महाडीक यांनी आपल्या तिजोरीत 24 ऑगस्ट रोजी 2.50 लाखरुपये व सोन्याची साखली असा काही ऐवज ठेवला होता. त्याच दिवशी रात्री त्यांच्या तिजोरीतील ऐवज चोरीला गेला. महाडिकयांनी या घटनेबाबत पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तपास केला मात्र हाती काहीच लागले नाही. दरम्यानच्या काळात अंबावले याच्या राहनीमानात फरक पडला. तसेच, त्याने व्हॉट्सअपला स्टेटसही वेगवेगळे येऊ लागले. संशय निर्माण झाल्याने महाडिक यांनी ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली. अंबरनाथ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कोते यांनी माहिती देताना सांगितले की, आम्ही गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.