अमरावती जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ: मोर्शी ते मेळघाट मधील उमेदवार, महत्वाच्या लढती आणि निकाल जाणून घ्या

त्यानुसार मोर्शी, धामणगांव,अचलपूर, मेळघाट, दर्यापूर, तिवसा, अमरावती, बडनेरा अशी मतदारसंघांनी नावे आहेत. तर यंदाच्या विधासभा निवडणूकीसाठी शिवसेना-भाजप महायुतीसह काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, मनसे आणि बहुजन आघाडी पक्ष कोणाला कशी टक्कर हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अमरावती विधानसभा निवडणूक मतदारसंघ आढावा (Photo Credits- File Image)

विदर्भातील महत्वाच्या मतदरासंघापैकीच अमरावती येथे एकूण आठ मतदारसंघ त्या अंतर्गत येतात. त्यानुसार मोर्शी, धामणगांव,अचलपूर, मेळघाट, दर्यापूर, तिवसा, अमरावती, बडनेरा अशी मतदारसंघांनी नावे आहेत. तर यंदाच्या विधासभा निवडणूकीसाठी शिवसेना-भाजप महायुतीसह काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, मनसे आणि बहुजन आघाडी पक्ष कोणाला कशी टक्कर हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्रात एकूण 287 मतदारसंघ आहेत. त्यामधील 29 मतदारसंघात अनुसूचित जातींसाठी आणि 25 मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

-मोर्शी विधासभा मतदारसंघ क्रमांक 43

अमरावती जिल्ह्यामधील वरुड आणि मोर्शी या दोन तालुक्यांचा मिळून बनलेला आहे. त्यानुसार हा मतदारसंघ लोकसभेसाठी वर्धा लोकसभा मतदारसंघ जोडला जातो. तर मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या अलीकडच्या मंत्रीमंडळातून मोर्शी मतदारसंघातून भाजपने दिलेल्या तिकिटावर निवडणून आलेले डॉ. अनिल बोंडे यांना यंदाच्या विधासभेसाठी पुन्हा तिकिट देण्यात आले आहे. डॉ. अनिल बोंडे हे मोर्शीचे विद्यमान आमदार आहेत. तर 2014 मध्ये बोंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे हर्षवर्धन देशमुख यांचा 31,449 या मतांनी पराभव झाला होता. यंदा विधासभा निवडणूकीसाठी मोर्शी मतदारसंघातून अनिल बोंडे यांच्या विरोधात नंदकिशोर कूयटे हे वंजित बहुजन आघाडी कडून उभे राहिले आहेत.

-धामणगांव रेल्वे विधानसभा मतदासंघ क्रमांक 36

धामणगांव रेल्वे मतदारसंघाला चांदुर रेल्वे मतदरासंघ म्हणून सुद्धा ओळखले जाते. सध्या विद्यमान आमदार विरेंद्र जगताप हे काँग्रेस पक्षाचे आहेत. यापूर्वी ही जगताप 2014 मध्ये ही याच विधानसभा मतदारसंघातून निवडणून आले होते. त्यावेळी जगताप यांच्या विरोधात उभ्या असलेल्या भाजपच्या अरुण अडसड यांचा 69,905 मतांनी पराभव झाला होता. तर यंदाच्या धामणगांव येथून विरेंद्र जगताप यांच्या विरोधात भाजप पक्षाचे प्रताप अडसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

-अचलपूर विधानसभा मतदारसंघ क्रमांक 42

अमरावती मधील अचलपूर हे सर्वात महत्वाचे आणि प्राचीन शहर म्हणून ओळखले जाते. या मतदरासंघातून सध्या अपक्षाचे विद्यामान आमदार बच्चू कडू आहेत. तर 2014 मध्ये बच्चू कडू यांच्या विरोधात भाजपचे अशोक बनसोड यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यावेळी अशोक बनसोडे यांचा पराभव 49,064 मतांनी पराभव झाला. मात्र यंदा शिवसेनेकडून सुनीता फिसके यांच्या विरोधात काँग्रेसचे अनिरुद्ध देशमुख यांना तिकिट देण्यात आले आहेत. अनिरुद्ध देशमुख यांना 2015 मध्ये सुद्धा उमेदावारी दिली होती पण 26,490 मते मिळवत त्यांचा पराभव झाला होता.

-मेळघाट विधानसभा मतदारसंघ क्रमांक 41

मेळघाट मतदारसंघ हा अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या मतदारसंघात आतापर्यंत काँग्रेस पक्षाची सत्ता राहिली आहे. आतापर्यंत आठ वेळा काँग्रेसचे उमेदवारांनी या मतदारसंघातून बाजी मारली आहे. मात्र यंदा येथील भाजपचे आमदार प्रभुदास भिलावेकर आहेत. 2014 मध्ये भिलावेकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकुमार पटेल यांचा 55,025 मतांन पराभव झाला. मात्र यंदा विधानसभा निवडणूकीत मेळघाट मतदारसंघातून भाजपचा रमेश मावस्कर राष्ट्रवादी पक्षाकडून केवळराम काळे यांना तिकिट देण्यात आले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 येत्या 21 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. तसेच या निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवत एक हाती सत्ता मिळवली होती. परंतु, या विधानसभेत कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.