वाशी बाजारात हापूस आंब्याचे आगमन; प्रत्येक पेटी मागे मोजावे लागणार 10,000 रुपये

त्यामुळे बाजारात देखील उत्साहाचे वातावरण आहे. मटा ने दिलेल्या वृत्तानुसार, पाच डझनच्या 5 पेट्या बाजारात आल्या आहेत. यात 5 डझनाच्या एका पेटीमागे 10,000 रुपये मोजावे लागणार आहेत.

हापूस आंबा photo credits PTI File Photo

कोकणची शान, कोकणचा अभिमान असलेल्या फळांचा राजा हापूस आंब्याचे वाशी बाजारात आगमन झाले. वर्षभरापासून ज्या फळाची सर्व आतुरतेने वाट पाहत असतात, त्या हापूस आंब्याच्या पेट्या वाशी बाजारात आल्या आहेत. त्यामुळे बाजारात देखील उत्साहाचे वातावरण आहे. मटा ने दिलेल्या वृत्तानुसार, पाच डझनच्या 5 पेट्या बाजारात आल्या आहेत. यात 5 डझनाच्या एका पेटीमागे 10,000 रुपये मोजावे लागणार आहेत. ही किंमत अनेकांच्या भुवया जरी उंचावल्या असल्या तरीही हापूस आंब्याचे चाहते कोणताही विचार न करता आंबा खरेदी करतील असे आंब्रे विक्रेते सांगतात.

यावर्षी लांबलेल्या पावसामुळे ऑक्टोबरमध्ये येणारा आंब्याचा मोहोर आलाच नाही. त्यानंतर आवश्यक ती थंडी पडली नाही. त्यामुळे आंब्याला मोहोर धरला नाही. दिवाळीनंतरही पाऊस थांबल्यावर डिसेंबरच्या सुरुवातीला धरलेला मोहोर काही शेतकऱ्यांनी टिकवून ठेवला. त्यातून लागलेले आंबे आत्ता बाजारात आले आहेत. रिकामीपोटी खाऊ नका ही 5 फळे, शरीरावर होतील दुष्परिणाम

 दरवर्षी डिसेंबरमध्ये होणारी हापूस आंब्याची दोन ते चार पेट्यांची आवक यावेळी उशिरा सुरू झाली. नवीन वर्ष उजाडले पाऊस काही जाण्याचे नाव घेत नव्हता. ज्याचा परिणामी आंबा उत्पादनावर झाला. त्यामुळा वाशी बाजारात आंबा येण्यासाठीही थोडा वेळ लागला. त्यामुळे मुंबईतील सर्व विक्रेत्यांसह ग्राहकही आंब्याची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र ती प्रतिक्षा आता संपली असून वाशी बाजारात हापूस आंबा उपलब्ध झाला आहे.
आंब्याचे वाशी बाजारपेठेत आगमन झाल्यानंतर आता हळूहळू तो अन्य बाजारात  देखील उपलब्ध होईल. मे महिन्यापर्यंत अगदी मोठ्या प्रमाणावर आंब्याची  विक्री सुरु होईल.