वानखडे बरोबर ब्रेबॉर्न मैदानाचाही क्वारंटाइन केंद्रासाठी विचार करावा- संजय राऊत
भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळून आली आहेत. राज्यात मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या महत्वाच्या शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.
जगभरात कोरोना विषाणूचे (Coronavirus) संकट आणखी गडद होताना दिसत आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळून आली आहेत. राज्यात मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या महत्वाच्या शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. मुंबईत करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता, मुंबई महानगरपालिकेने वानखेडे मैदान क्वारंटाइन सुविधेसाठी आपल्या ताब्यात द्यावे अशी विनंती मुंबई क्रिकेट असोसिएशनला केली आहे. यातच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanajay Raut) यांनी वानखेडे (Wankhade Stadium) बरोबर ब्रेबॉर्न मैदानाचाही (Brabourne Stadium) क्वारंटाइन केंद्रासाठी विचार करावा, अशी सूचना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून केली आहे.
मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वानखेडे मैदानाचा रुपांतर क्वारंटाइन केंद्र म्हणून विकसित करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा विचार सुरु आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निर्णयाचे संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्वागत केले आहे. मुंबईची वाढती कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता वानखेडे बरोबर ब्रेबॉर्न मैदानाची क्वारंटाइन केंद्रासाठी विचार करावा, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. हे देखील वाचा- मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल Yauatcha मधील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण; अनिश्चित काळासाठी व्यवसाय बंद
संजय राऊत यांचे ट्विट-
सजंय राऊत यांच्या ट्विटला शिवसेना आमदार अदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, अदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, येणारा पावसाळा लक्षात घेता ज्या ठिकाणी मातीची मैदान आहेत, असे ठिकाण क्वारंटाइन केंद्र म्हणून वापरता येणार नाही. ज्या ठिकाणी पक्की किंवा कॉक्रीटीकरत केलेली जमीन , अशी मैदान क्वारंटाइन केंद्र म्हणून वापरता येतील. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून अशी ठिकाणे आम्ही ताब्यात घेतली आहेत, असेही अदित्य ठाकरे ट्विटद्वारे म्हणाले आहेत