वर्धा: शिक्षिकेला जिंवत जाळणाऱ्या आरोपीला फाशी द्या, सर्वपक्षीयांकडून 'हिंगणघाट बंद'ची हाक
तसेच या सर्व प्रकाराच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नेत्यांकडून ‘हिंगणघाट बंद’ची हाक देण्यात आली आहे. सोमवारी हिंगणघाटमधील शिक्षिकेला पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे या धक्कादायक घटनेच्या निषेधार्थ आज हिंगणघाट येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात शहरातील विद्यार्थीही तसेच पीडित शिक्षिकेच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींचाही समावेश असणार आहे.
वर्ध्यामधील (Wardha) शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे. तसेच या सर्व प्रकाराच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नेत्यांकडून ‘हिंगणघाट बंद’ची (Hinganghat Bandh) हाक देण्यात आली आहे. सोमवारी हिंगणघाटमधील शिक्षिकेला पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे या धक्कादायक घटनेच्या निषेधार्थ आज हिंगणघाट येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात शहरातील विद्यार्थीही तसेच पीडित शिक्षिकेच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींचाही समावेश असणार आहे.
एकतर्फी प्रेमातून आरोपीने सोमवारी पीडित तरुणीला जिवंत जाळले होते. यामध्ये पीडित शिक्षिका 20 ते 30 टक्के भाजली होती. सध्या नागपूरमध्ये पीडित तरुणीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विक्की नगराळे याला अटक केली आहे. (हेही वाचा - वर्धा: कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणीला भरचौकात पेट्रोल टाकून जाळले)
पीडित तरुणीला जाळण्याचा प्रयत्न करणारा आरोपी विक्की नगराळे हा पीडितवर एकतर्फी प्रेम करतो. विक्कीचे लग्न झालेले असून तो पीडित तरुणीच्या गावातचं राहतो. या सर्व प्रकारामुळे गावातील नागरिक संतप्त झाले असून जिल्ह्यातील सर्वपक्षियांनी आज हिंगणघाट बंदची हाक दिली आहे.