Alibaug Rename: अलिबागच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत, राहुल नार्वेकर यांचे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र; 'हे' नाव देण्याचा सल्ला
औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद पाठोपाठ आता अलिबागचे नाव बदलावे असे पत्रच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवले आहे.
Alibaug Renaming Demand Issue: भाजप नेते आणि विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी अलिबागचे नाव बदल्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. त्या बदल्यात त्यांनी अलिबाग ऐवजी दुसरे नाव ही सुचवले आहे. अलिबागचं नाव बदलून मायनाक नगरी (Mynak Nagri) करावं असं राहुल नार्वेकर यांनी या पत्रात म्हटलं आहे. मात्र, एकिकडे राहुल नार्वेकर यांनी अलिबागचे नाव बदल्याची मागणी केली असली तरी दुसरीकडे स्थानिकांनी त्याला विरोध दर्शवला आहे. अगदी सोशल मीडियापासून ते अलिबागमधील आजी माजी राजकारणाऱ्यांपर्यंत अनेकांनी नार्वेकरांच्या मागणीचा विरोध केला आहे. ( हेही वाचा :Mumbai News: व्हिडिओ पाहून एटीएममधून पैसे चोरण्याचा प्रयत्न, आरोपीला वाकोला पोलिसांकडून अटक )
अलिबागचं नाव बदलून मायनाक नगरी करावं असं नार्वेकर यांनी या पत्रात म्हटलं आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी राज्यातील औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद जिल्ह्यांची नाने बदलली होती. पाठोपाठ आता अलिबागचे नाव बदलून मायनाक नगरी करण्यात यावे, असा उल्लेख या पत्रात करण्यात आला. तसेच नाव का बदललं जावं याबद्दलचा युक्तीवाद ही नार्वेकरांनी केला आहे. "अलिबाग येथील खांदेरी-उंदेरी बंदरावरील किल्ला आणि तेथील मायनाक भंडारी यांनी केलेल्या चिवट पराक्रमी संघर्षामुळे इंग्रजांना माघार घेण्यास भाग पाडले. मायनाक भंडारी यांनी स्वराज्याचे रक्षण केले होते. त्यामुळे औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबादनंतर अलिबागचे नाव बदलून मायनाक नगरी करण्यात यावे," असं म्हटलं होतं. त्याशिवाय, अलिबागमध्ये मायनाक भंडारी यांचे भव्य स्मारक उभारण्यात आलं पाहिजे अशी मागणीही नार्वेकरांनी पत्रातून केली.
नार्वेकरांनी केलेल्या मागणीला आलिबाग करांकडून तर विरोध होतचं आहे. पण, कान्होजीराजे आंग्रेंचे वंशजांकडूनही विरोध होत आहे. रघुजीराजे आंग्रेंनी नार्वेकरांच्या मागणीचा निषेध केला. तसेच त्यांनी अलिबागचे नाव बदलाची गरज नाही असं म्हटलं. आणि जीर ना बदलायचे असेल तर सरखेल कान्होजीराजे आंग्रेंच्या नावाचा विचार प्राधान्याने व्हावा अशी मागणी रघुजीराजे आंग्रेंनी केली. गुरुवारी सोशल मीडियावर‘आय लव अलिबाग’ हा ट्रेण्ड पहायला मिळाला.