Akola Shiv Sena: अकोला शिवसेनेतील मतभेद चव्हाट्यावर, आमदार नितीन देशमुख यांच्यावर गंभीर आरोप, पक्षप्रमुखांना पाठवले पत्र
पक्षांतर्गत वादातून थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाच पत्र लिहिण्यात आल्याचेही समजते. विधानपरिषद निवडणुकीत गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) यांचा अनपेक्षीत पराभव झाला.
अकोला शिवसेनेमध्ये (Akola Shiv Sena) सध्या पक्षांतर्गत वाद शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे. पक्षांतर्गत वादातून थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाच पत्र लिहिण्यात आल्याचेही समजते. विधानपरिषद निवडणुकीत गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) यांचा अनपेक्षीत पराभव झाला. या पराभवानंतर अकोला शिवसेनेत मतभेद तीव्र झाले आहेत. त्यातून शिवसेना सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकर (Shrirang Pinjarkar) यांनी जिल्हाप्रमुख, आमदार नितीन देशमुख ( Nitin Deshmukh) गटाविरोधात दंड थोपटले आहेत. त्यांनी थेट पक्षप्रमुखांना पत्र लिहीत आमदार आणि जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पत्रातील मुद्दे पाहता शिवसेनेतील संघर्ष अधिक टोक गाठणार असे दिसते.
प्राप्त माहितीनुसार, श्रीरंग पिंजरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाप्रमुखांची तक्रार करणारे पत्र शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई (MP Anil Desai) यांच्याकडे दोन दिवसांपूर्वीच सोपवले आहे. अकोला शिवेसना शहर प्रमुख राजेश मिश्रा हे सुद्धा जिल्हा प्रमुखांनाच साथ देतात त्यामुळे पक्षाच्या दयनीय अवस्थेला तेच कारणीभूत असल्याचे पत्रात म्हटले आहे. (हेही वाचा, Shiv Sena on BJP: पाच राज्यांत भाजपच्या यशावर शिवसेनेची 'सामना'तून तिखट प्रतिक्रिया म्हटले, 'माकडाच्या हाती दारूची बाटली आल्यावर..')
धक्कादाय म्हणजे या पत्रात आमदार नितीन देशमुख हे जिल्ह्यात खंडणीखोरी करतात. आमदार देशमुख हे वसुलीसाठी सर्वात पुढे असल्याचा आरोपही पिंजरकर यांनी केला आहे. नितीन देशमुख यांच्या विचीत्र कारभारामुळे अकोला जिल्ह्यातील सरकारी अधिकारी कंत्राटदार असे सर्वजणच धास्तावले आहेत. भाजपशी संधान साधून नितीन देशमुख हे शिवसेना संपविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात यावी. त्या ठिकाणी नव्याने निवडणउका घेत नेमणुका कराव्यात अशी मागणीही यापत्रात करण्यात आली आहे.
नितीन देशमुख देशमुख यांचे राजकारण विश्वासार्ह नाही.या आधी ते चार पक्ष फिरुन आले आहेत. सुरुवातीला वंचित बहुजन आघाडी. नंतर जनसुराज्य आणि मग भाजपमार्गे ते शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे गोपिकीशन बाजोरीया जेव्हा निवडणुकीसाठी उभे होते तेव्हा त्यांनी विरोधात काम केले, असा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.