Akola Murder Case: 20 दिवसांच्या आजारी मुलीची आईकडून हत्या; अकोला मधील घटना
आयपीसी 302 देखील लागू आहेत.
अकोला (Akola) मध्ये 20 दिवसाच्या आजारी मुलीचा जीव घेतल्याप्रकरणी आईला अटक करण्यात आली आहे. अकोला मधील ही घटना धक्कादायक आणि तितकीच सुन्न करणारी आहे. अदमपूर (Adampur Village) मधील वाडी (Wadi) येथील रहिवासी असलेली ही महिला 26 वर्षीय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्यासोबत दूरच्या नात्यातील काकांनी आजारी मुलीला उपचारासाठी मागील महिन्यात चिमुकलीला ग्रामीण रूग्णालयामध्ये नेले होते.
डॉक्टरांनी मुलीची प्रकृती पाहून तिला अकोला मधील जिल्हा रूग्णालयामध्ये हलवण्याचा सल्ला दिला होता. मुलीला जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले पण तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. नंतर पोस्ट मार्टम रिपोर्ट पाहिला तर या चिमुरडीचा गळा आवळून तिची हत्या करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान मुलीचा जीव का घेतला? यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही. हे देखील नक्की वाचा: Kolhapur Crime: बापाला शौचालयात जिवंत जाळण्याचा प्रयत्न, मुलगा आणि सुनेचे कृत्य; कोल्हापूर येथील घटना .
अटक करण्यात आलेल्या महिलेवर खूनाची कलमं लावण्यात आली आहे. आयपीसी 302 देखील लागू आहेत. मंगळवारी महिलेला कोर्टात सादर करण्यात आले होते. पोलिसांनी तिच्या कोठडीमध्ये 2 दिवसांची वाढ केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड यांनी या प्रकरणामध्ये अधिक तपास सुरु असल्याची माहिती दिली आहे.