Zeeshan Siddiqui यांना Mumbai Youth Congress President पदावरून हटवले; युवक काँग्रेसमध्ये फेरबदल

मुंबई सोबतच दिल्ली, गोवा, अंदमान निकोबार, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा मध्येही मुंबई प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत.

Zeeshan Siddiqui

बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddiqui) यांना कॉंग्रेसने Mumbai Youth Congress president पदावरून दूर केले आहे. आता झिशान यांच्या जागी कॉंग्रेसने मुंबई युथ कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यावर सोपावली आहे. तर कार्याध्यक्ष पदी सुफियान मोहसीन हैदर (Sufiyan Mohsin Haider) यांना नेमण्यात आले आहे. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी संघटनेत फेरबदल केले आहेत. मुंबई सोबतच दिल्ली, गोवा, अंदमान निकोबार, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा मध्येही मुंबई प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वीच बाब्बा सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली एनसीपी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत झिशान देखील जाण्याची चर्चा होती मात्र त्यांनी तूर्तास कॉंग्रेस पक्षासोबतच असल्याचं जाहीर केले आहे. मुंबई मध्ये वांद्रे पूर्व विधानसभा मतरदारसंघाचे झिशान प्रतिनिधित्त्व करतात. बाबा सिद्दीकी यांच्या एनसीपी मध्ये पक्षप्रवेशानंतर अजित पवार यांनी झिशान यांच्या कार्यालयाला भेट दिली होती.

झिशान सध्या कॉंग्रेस पक्षाचे विद्यमान आणि विधानसभेतील सर्वात तरूण आमदार आहेत. त्यांनी अद्याप पक्ष सोडला नसला तरीही वरिष्ठांबद्दल, महाविकास आघाडीच्या सरकार मध्ये त्यांना मिळणार्‍या वागणूकीबद्दल नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती.

देशात अनेक राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. काही दिवसांतच आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा, आचारसंहिता लागू केली जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसमध्ये फेरबदल करण्यात आल्याचं कॉंग्रेस कडून सांगितले जात आहे.