Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan 2020: 27 मार्च ते 14 जून दरम्यान पार पडणार 100 वे मराठी नाट्य संमेलन, जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम
यावर्षीचे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन (Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan 2020) 27 मार्च ते 14 जून दरम्यान पार पडणार 100 वे मराठी साहित्य संमेलन, जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम ऐतिहासिक असे ठरणार आहे. यंदाचे 100 वे नाट्य संमेलन असणार आहे, त्यामुळे या संमेलनाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटणार आहेत. 27 मार्च, जागतिक रंगभूमी दिनी सांगली (Sangli) येथे या नाट्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर तब्बल तीन महिन्यांनतर 14 जून रोजी मुंबईमध्ये याचा समारोप सोहळा पार पडेल. हा समारोप सोहळा चक्क आठवडाभर रंगणार आहे. महाराष्ट्रामध्ये अशाप्रकारे हा पहिला टप्पा पडेल, त्यानंतर दुसरा टप्पा संपूर्ण भारतात पार पडेल. काल बुधवारी याबाबत माहिती देण्यात आली.
जब्बार पटेल हे यंदाच्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष आहेत. यंदाचे संमेलन हे परिसंवाद, मुलाखती यांच्या माध्यमातून मनोरंजनापलीकडे असेल असे पटेल यांचे म्हणणे आहे.
असा असेल संपूर्ण कार्यक्रम –
25, मार्च गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची सुरुवात होईल. व्यंकोजीराजे यांनी 19 नाटके लिहिली आहेत, यादिवशी त्यांच्या नाट्य संपदेला तंजावर येथे अभिवादन करण्यात येईल. (हेही वाचा: मराठीतील वादग्रस्त नाटके; ज्यांनी रंगभूमी ढवळून टाकली)
26 मार्च रोजी नाट्यदिंडीने सांगलीमध्ये नाट्य संमेलनाची अधिकृत सुरुवात होईल. त्यादिवशी संध्याकाळी सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘सीता स्वयंवर’ या संगीत नाटकाचा प्रयोग होईल.
27 मार्च ते 29 दरम्यान, नाट्य संमेलनाचा सोहळा रंगेल.
त्यानंतर संमेलनाच्या महाराष्ट्रातील टप्प्याला सुरुवात होईल. 30 मार्च ते 7 जून या दरम्यान नाट्यजागर होणार आहे. राज्यामध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखा ज्या ठिकाणी आहेत तिथे हा उपक्रम पार पडेल. ग्रामीण भागातही नाटक पोहोचावे या यामागील उद्देश आहे.
पुढे मुंबईमध्ये 8 ते 14 जून दरम्यान समारोप सोहळ्यात आयोजित करण्यात आला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 30, 2020 02:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

