Ajit Pawar Viral Video: 'थोडं बारीक व्हा', रोखठोक अजित पवार यांचा भर कार्यक्रमता पोलीस उपायुक्तांना सल्ला
डीसीपी डॉ. काकासाहेब काळे हे फायर फायटर बाईकची प्रातिनीधिक चावी घेऊन व्यासपिठावरुन खाली उतरले. या वेळी अजित पवार हे काळे यांना सल्ला दिल्यावर पोलीस आयुक्तांसोबतही या विषयावर काही चर्चा करताना दिसले. या वेळी त्यांनी माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या कार्यकाळाचीही अठवण काढली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आपला रोखठोक आणि शिस्तप्रिय स्वभाव यासाठी ओळखले जातात. आरोग्य आणि शारीरिक तंदुस्ती याबाबतही ते नेहमीच दक्ष असतात. याचा प्रत्यय पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथे झालेल्या कार्यक्रमात नुकताच आला. निमित्त होते पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारतीत फायर फायटर बाईक (Firefighter Bikes) आणि पोलिसांना गस्त घालण्यासाठी देण्यात आलेल्या अत्याधुनिक बाईक वितरणाचे. या वेळी या बाईकची चावी स्वीकारण्यासाठी पोलीस आयुक्तालयातील डीसीपी डॉ. काकासाहेब डोळे हे व्यासपीठावर आले. डोळे हे काही प्रमाणात लठ्ठ आहेत. यावर त्यांच्याकडे पाहून अजित पवार यांनी सर्वांसमोरच 'बारीक व्हा.. थोडं बारीक व्हा..' असा सल्ला दिला. या वेळी आयुक्त अंकुश शिंदे हे देखील उपस्थित होते.
डीसीपी डॉ. काकासाहेब काळे हे फायर फायटर बाईकची प्रातिनीधिक चावी घेऊन व्यासपिठावरुन खाली उतरले. या वेळी अजित पवार हे काळे यांना सल्ला दिल्यावर पोलीस आयुक्तांसोबतही या विषयावर काही चर्चा करताना दिसले. या वेळी त्यांनी माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या कार्यकाळाचीही अठवण काढली. ते म्हणाले आर आर पाटलांच्या काळात पोलिसांच्या तंदुरुस्तीविषयी काही काम झाले. त्यांच्या काळात पोलिसांसाठी फिटनेस भत्ताही सुरु केला होता, अशी आठवण त्यांनी सांगितली. (हेही वाचा, Ajit Pawar On Wine Decision: वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक, पण काही लोक सरकारला बदनाम करत आहेत-अजित पवार)
ट्विट
सामाजिक सुरक्षेसाठी पोलीस ही नेहमीच महत्त्वाची भूमिका निभावतात. त्यामुळे त्यांची तंदुरुस्ती हा मुद्दा नेहमीच महत्त्वाचा ठरतो. मात्र, पोलीस हे देखील आपल्यासारखेच नागरिक आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही दैनंदिन कामाचा ताण. व्यक्तीगत आयुष्यातील ताण शिवाय बदलती जीवनशैली. खाण्यापिण्याच्या सवयी. व्यायामाचा आणि संतुलीत आहाराचा आभाव या सर्वच बाबींचा मानवी शरीरावर मोठा परिणाम होतो. पोलिसही त्याला अपवाद नसतात. त्यामुळे पोलिसांच्या तंदुस्तीचा मुद्दा अधिक महत्त्वाचा ठरतो आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)