अजित पवार आमचे आगामी उपमुख्यमंत्री: शिवसेना खासदार संजय राऊत

अजित पवारांच्या या नाराजीनाट्यानंतर त्यांना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कोणतं पद मिळणार यावर उलट सुलट चर्चा रंगत आहे.

Sanjay Raut | Photo Credit :- Facebook

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हेच आमचे होणारे उपमुख्यमंत्री असल्याचं विधान शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी अजित पवारांना सिंचन घोटाळा प्रकरणी मिळालेल्या क्लिनचीटवरून अभिनंदन देखील केलं आहे. दरम्यान 28 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर महाविकास आघाडी सरकारच्या सहा मंत्र्यांसह उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा पार पडला. मात्र आता कॅबिनेटच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अजित पवारांचाही समावेश होणार अशी चर्चा आहे. दरम्यान विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात सुमारे महिनाभर सत्ताकोंडी होती. यामध्ये अजित पवार यांनी भाजपासोबत जाऊन उपमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर अजित पवारांची मनधरणी करून एनसीपीमध्ये परत येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. अजित पवारांच्या या नाराजीनाट्यानंतर त्यांना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कोणतं पद मिळणार यावर उलट सुलट चर्चा रंगत आहे. सिंचन घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना एसीबी कडून पूर्णपणे क्लिनचीट

दरम्यान नागपूरमधील विधिमंडळ अधिवेशन पार पडल्यानंतर मुंबईमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार 24 डिसेंबरला हा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. या पार्श्वभूमीवरच काल (20 डिसेंबर) सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवारांना अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोकडून क्लिन चीट मिळणं हा योगायोग महत्त्वपूर्ण आहे. तर अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार जी जबाबदारी देतील ती स्वीकारायला तयार असल्याचं म्हटलं आहे.   महाविकास आघाडीचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार 24 डिसेंबरला?

 

अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने जरी अजित पवारांना क्लिन चीट दिली असली तरीही त्यांचं शपथपत्र कोर्टात स्वीकारलं जाऊ शकत नाही. असे म्हणत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आज विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा या मुद्द्यावरून गाजण्याची शक्यता आहे.