Ajit Pawar Visits Fire-Damaged Kolhapur Theatre: अजित पवारांनी दिली आगीत नुकसान झालेल्या कोल्हापूर नाट्यगृहाला भेट; पुनर्बांधणीसाठी 20 कोटींची घोषणा
रविवारी अजित पवार, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेत्यांनी घटनास्थळाला भेट दिली. अजित पवार यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाचे फोटो शेअर करत एक्सवर पोस्ट केली आहे.
Ajit Pawar Visits Fire-Damaged Kolhapur Theatre: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला (Keshavrao Bhosale Natyagruha) भेट दिली. 8 ऑगस्टच्या रात्री या नाट्यगृहाला आग (Fire) लागली होती. रविवारी अजित पवार, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेत्यांनी घटनास्थळाला भेट दिली. अजित पवार यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाचे फोटो शेअर करत एक्सवर पोस्ट केली आहे.
या पोस्टमध्ये अजित पवार यांनी म्हटलं आहे की, 'कोल्हापूरचे थोर कलावंत संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच 'केशवराव भोसले नाट्यगृहाला' लागलेली भीषण आग ही कोल्हापूरकरांसाठी आणि समस्त कलाकारांसाठी अत्यंत दुःखद घटना आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. हसन मुश्रीफजी, इतर पदाधिकारी व माझे सहकारी यांच्यासह आज मी घटनास्थळी भेट देऊन जागेची पाहणी केली. मी कोल्हापूरकरांना सांगू इच्छितो, हे नुकसान लवकरात लवकर भरून काढून ही वास्तू त्याच दिमाखात आणि डौलाने उभी करण्यासाठी माझ्या परीने सर्व प्रयत्न मी करेन !' (हेही वाचा - Keshavrao Bhosale Natyagruha Fire: कोल्हापूरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक; कलाकारांना अश्रू अनावर)
अजित पवार ट्विटर -
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 109 वर्षे जुन्या ऐतिहासिक नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी 20 कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. तथापी, पोलिस नाट्यगृहाला लागलेल्या आगीच्या कारणांचा शोध घेत आहेत. एकनाथ शिंदे यांनी या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
सरकार समाजाच्या इच्छेचा आदर करत नाट्यगृहाची पुनर्बांधणी करण्यासाठी तत्परतेने काम करेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. हे नाट्यगृह छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकाराने 1915 मध्ये स्थापन करण्यात आले होते.