Ajit Pawar diagnosed with Dengue: अजित पवार यांना डेंग्यू ची लागण; प्रफुल्ल पटेल यांची 'दादांच्या' नाराजीच्या वृत्तादरम्यान ट्वीट करत माहिती
अजित पवार नाराज असल्याच्या मीडीया रिपोर्ट्सला प्रफुल्ल पटेल यांनी फेटाळलं आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांची मागील काही दिवसांत अनेक कार्यक्रमांमधील अनुपस्थिती चर्चेचा विषय बनली होती. त्यावरून नाराजीच्या वावड्या उठल्या होत्या. पण आता अजित पवार गटातील प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी अजित पवारांना डेंगी/ डेंग्यूची (Dengue) लागण झाल्याचं म्हटलं आहे. ट्वीट करत त्यांनी अजित पवारांच्या हेल्थ बद्दल अपडेटस दिले आहेत. 'काल अजित पवारांना डेंग्यूची लागण झाल्याचं निदान झालं आहे. पुढील काही दिवस त्यांना आराम करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. आजारपणातून बाहेर पडल्यानंतर ते पुन्हा लोकांच्या सेवेत रूजू होतील'. असं ट्वीत प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी अजित पवार नाराज असल्याच्या मीडीया रिपोर्ट्सला फेटाळलं आहे.
अजित पवार हेल्थ अपडेट
अजित पवारांवर घरीच उपचार सुरू आहेत. दरम्यान मागील दोन दिवसांपासून ते काही कार्यक्रमांपासून लांब होते. दोन दिवसांपूर्वी अहमदनगर दौर्यावर आलेल्या नरेंद्र मोदींसोबत ते व्यासपीठावर दिसले होते. Maharashtra Politics: रोहित पवारांसह शरद पवार गटातील 8 आमदारांना विधीमंडळाची नोटीस .
सध्या राज्यातही डेंग्यूचा प्रकोप वाढत आहे. अनेकांना डेंग्यूची लागण होत आहे. डेंग्यू हा डासांच्या मार्फत होणारा एक विषाणूजन्य आजार आहे. यामध्ये थंडी वाजून ताप येणे, घसा, डोके आणि सांधे दुखणे अशी लक्षणे आढळतात.