Maharashtra Politics: मंत्रीमंडळाच्या विस्तारावरुन अजित पवारांसह सुप्रिया सुळेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल
शिंदे सरकारवर मंत्रीमंडळ विस्ताराच्या मुद्दयावरुन अजित पवारांसह सुप्रिया सुळेंनी निशाणा साधला आहे.
राज्यात नवीन सरकार स्थापन होवून एक महिना पूर्ण झाला तरी देखील मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त काही निघालाचं नाही. फक्त राज्याची जनताचं नाही तर भाजपातील आमदारासह शिंदेगटातील आमदार सुध्दा मंत्रीमंडळ विस्ताराच्या प्रतिक्षेत आहेत. शिंदे सरकारवर मंत्रीमंडळ विस्ताराच्या मुद्दयावरुन दररोज विरोधकांकडून ताशेरे ओढले जातात. तरी राज्यात मंत्रीमंडळाचं भिजत घोंगडचं आहे. फक्त मुख्यमंत्री (CM) आणि उपमुख्यमंत्री (Deputy CM) हे दोघं मिळून संपूर्ण राज्याचा कारभार बघत आहेत. तर विनाकुठल्या खात्याच्या आणि विनाकुठल्या मंत्र्याच्या 400 हून अधिक जीआर (GR) या एक महिन्याच्या कालावधीत काढण्यात आले आहेत. मंत्रीमंडळाच्या या तिढ्याबाबत बोलण्यासाठी विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) आज पत्रकार परिषद (Press Conference) घेत आपली परखड भुमिका मांडली.
मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत (Cabinet Expansion) लवकरच राज्यपाल भगत सिंह कोश्यारीची (Governor Bhagat Singh Koshyari) भेट घेणार असल्याचं विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी सांगितल.राज्याच्या विकासाठी मंत्रीमंडळ लवकरात लवकर स्थापन करण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले. तसेच राज्य विधीमंडळाचे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे, त्याबाबत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी पवारांनी विदर्भासह (Vidarbha) मराठवाड्यातील (Marathwada) पूरग्रस्त भागाची पहाणी केली, संबंधीत पंचनामे करत सरकारने तात्काळ पूरग्रस्तांना मदत देवू करावी करावी अशी भुमिका विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी मांडली आहे. (हे ही वाचा:-Sanjay Raut ED Enquiry: केंद्र सरकारकडून ईडी, सीबीआयआणि आयटी सारख्या प्रमुख तपास यंत्रणांचा गैरवापर केल्यासंबंधी शिवसेनेकडून राज्यसभेत कामकाजाच्या निलंबनाची नोटीस)
खातेवाटपाच्या मुद्द्यावरुन खासदार सुप्रिया सुळे (Supriya) यांनी देखील शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात सत्तांतर होऊन आता महिना पूर्ण झाला तरीही खातेवाटप होत नाही. राज्यातील सरकार हे 'एक दुजे के लिए' (Ek Duje Ke Liye) असे दोघांचेच सरकार असल्याची खोचक टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. दरम्यान सुप्रिया सुळेंनी आदित्य ठाकरेंना (Aditya thackeray) पाठींबा दर्शवला आहे. जो लढतो, कष्ट करतो त्याला लोक नेहमीच प्रतिसाद देतात, याची प्रचिती आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेतून आली. जो राज्यासाठी कष्ट करतो, राज्याला न्याय देतो, गरीब जनतेचा आवाज बनतो त्याच्यामागे जनाता उभी राहते, हा इतिहास महाराष्ट्राने पाहिला आहे अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.