BMC On Air Pollution & Masks: 'मास्क वापारा आम्ही म्हणालोच नाही', मुंबई महापालिकेचे पत्रकाद्वारे स्पष्टीकरण, सोशल मीडियातील माहितीचेही खंडण
मुंबई शहराती हवेची गुणवत्ता कमी झाली असली तरी नागरिकांना मास्क वापरण्याबाबत आपण कोणत्याही प्रकारचे अवाहन केले नसल्याची माहिती मुंबई महापालिका म्हणजेच BMC ने दिली आहे.
Mumbai Air Quality Index: मुंबई शहराती हवेची गुणवत्ता कमी झाली असली तरी नागरिकांना मास्क वापरण्याबाबत आपण कोणत्याही प्रकारचे अवाहन केले नसल्याची माहिती मुंबई महापालिका म्हणजेच BMC ने दिली आहे. मुंबई शहरात घसरलेल्या हवेच्या निर्देशांकाचा दाखला (BMC On Air Pollution) देत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या माहिती आणि काही प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तामध्ये महापालिकेने तसे अवाहन केल्याचा दावा केला जात होता. मात्र, प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया यांच्यामाध्यमातून आलेल्याकोणत्याही सूत्रांच्या अथवा माहितीच्या आधारे केल्या जाणाऱ्या दाव्यात तथ्य नसल्याचे सांगत बीएमसीने हे दावे आणि वृत्तांचे खंडण केले आहे. पालिकेने त्यासंदर्भात एक पत्रकही प्रसिद्ध केले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या माहितीमध्ये दावा केला जात होता की, मुंबई शहराती हवेची गुणवत्ता प्रचंड प्रमाणात कमी झाली आहे. परिणामी नागरिकांना श्वसनाशी संबंधित आजार होऊ लागले आहेत. अशा स्थितीत सुरक्षेचा उपाय म्हणून नागरिकांनी आपल्या चेहऱ्याला मास्क लावावेत असे अवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. अशा प्रकरचा आशय असेले अनेक वेगवेगळे मेसेज सोशल मीडियात व्हायरल झाले होते. दरम्यान, हवेची गुणवत्ता घसरल्याच्या माहितीशिवाय केल्या जाणाऱ्या दाव्यात कोणतेच तथ्य नव्हते हे आता महापालिकेच्या खुलाशानंतर पुढे आले आहे. (हेही वाचा, Pune Air Pollution: दिल्लीला नावे काय ठेवता? मुंबई पाठपोपाठ पुणे शहरातील हवेची गुणवत्ता सुद्धा खालावली, घ्या जाणून)
मुंबई महापालिका प्रसिद्धीपत्रकात काय म्हटले आहे
मुंबई महापालिकेद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहरातील (मुंबई) हवेची गुणवत्ता घसरली आहे. हवेचा निर्देशांक कमालीचा खाली आला आहे हे खरे आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासनाच्या संबंधित विभागांशी समन्वय साधून विचारविनीमय सुरु आहे. मात्र, अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. तसेच, नागरिकांना मास्क वापरण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचे अवाहन, सूचनाही करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे समाजमध्यामांतून पालिकेच्या नावाने केले जाणारे दावे, माहिती हे पूर्णपणे निराधार आहेत.
दरम्यान, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, दरवर्षी जगभरातील सुमारे 7 दशलक्ष मृत्यूंना वायु प्रदूषण जबाबदार आहे. सध्या दहा पैकी नऊ मानव प्रदूषकांसाठी WHO च्या मार्गदर्शक तत्त्वांच्या मर्यादेपेक्षा जास्त हवेचा श्वास घेतात, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये राहणाऱ्यांना याचा सर्वाधिक त्रास होतो. युनायटेड स्टेट्समध्ये, 1970 मध्ये स्थापित केलेला स्वच्छ वायु कायदा, या हानिकारक वायु प्रदूषकांच्या उत्सर्जनाचे नियमन करून सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी यू.एस. पर्यावरण संरक्षण एजन्सी (EPA) ला अधिकृत करतो.