Air India: एअर इंडियाचे विमान एमरजन्सी डायवर्ट, पायलटच्या तक्रारीमुळे मुंबईत सुरक्षीत लँडींग

दुबई-कोच्ची (Dubai-Cochin) मार्गावर फ्लाईट डायवर्ट करण्यात आले. पायलटच्या तक्रारीनंतर हे विमान मुंबईमध्ये सुरक्षीत लँड करण्यात आले.

Air India | (Photo Credits: Facebook)

एअर इंडिया (Air India) कंपनीचे विमान मुंबईला (Mumbai ) डायवर्ट करण्यात आले आहे. दुबई-कोच्ची (Dubai-Cochin) मार्गावर फ्लाईट डायवर्ट करण्यात आले. पायलटच्या तक्रारीनंतर हे विमान मुंबईमध्ये सुरक्षीत लँड करण्यात आले. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबईवरुन कोच्चीसाठी या विमानाने उड्डाण भरले. एअर इंडियाच्या ड्रमलायनर विमानाला पायलटकडून दबाव कमी झाल्याच्या सूचना मिळाल्या. त्यानंतर हे विमान मुंबईच्या दिशेने वळविण्यात आले.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, एअर इंडिया बोईंग फ्लाईट B787, फ्लाइट क्रमांक AI- 934 (दुबई-कोचीन) मध्ये कमी दाबाची घटना नोंदवली गेली. त्यानंतर विमान मुंबईकडे वळवण्यात आले आणि ते सुरक्षितपणे उतरवण्यात आले. प्रशासनाने घटनेची नोंद घेतली असून, O/o DAS WR च्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्राथमिक तपास करण्याचे काम सोपवण्यात आले आहे, अशी माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) दिली आहे.

ट्विट

प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, बोइंग 787 चे उड्डाण झाले त्यानंतर एआई-934 अचानक उतरविण्यात आले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने म्हटले की, या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. असे का घडले याचीही चौकशी सुरु आहे. विमानाच्या केबीनमध्ये पुरेसा दबाव नसताना विमानाचे उड्डाण करणे ही एक कारणाशिवाय जोखिम घेण्यासारखे आहे. असे काही घडले तर तत्काळ माहिती देण्याबाबत पायलटला आगोदरच प्रशिक्षण दिले जाते.