नांदेड येथे चार्टर विमान धावपट्टीवरुन घसरल्याने अपघात; मोठी दुर्घटना थोडक्यात टळली
दरम्यान, धवपट्टीवरुन घसरलेले विमान हे अद्यापही घटनास्थळी तसेच आहे. विविध यंत्रांच्या माध्यमांतून हे विमान धावपट्टीवर घेण्यात येईल. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
एअर एॅबुलन्स (Air Ambulance) चार्टर विमान (Charter Plane) धावपट्टीवरुन घसरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात नांदेड विमानतळ (Nanded Airport) धावपट्टीवर बुधवारी रात्री 2 ते तीन वाजनेच्या सुमारास घडला. नांदेड येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये अनिल काळे नावाचा जखमी युवक उपचार घेत होता. या युवकाचा ब्रेणडेड झाल्याने त्याचे अवयव मुंबई येथे पाठवण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला. हेच अवयव घेऊन जाण्यासाठी एअर एॅबुलन्स नांदेड विमानतळावर दाखल झाली होती. दरमय्यान, तिला अपघात घडला.
दरम्यान, हा अपघात घडल्यानंतर अवयव मुंबईला कसे न्यायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला होत. त्यामुळे दुसऱ्या विमानास पाचारण करुन हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्या आला. परंतु, या विमाणास उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली. अनेक प्रयत्न करुनही अखेर हे ग्रीन कॉरिडॉर यशस्वी होऊ शकले नाही. विमान घरण्याच्या घटनेनंतर चंदिगड, दिल्ली, मुंबई असा प्रवास करणारी विमानसेवा दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिक माहिती देताना एअर इंडिया स्टेशन मॅनेजर गजेंद्र गुट्टे यांनी सांगितले की, चंदिगड-नांदेड आणि दिल्ली-नांदेड एअर इंडिया सेवा काही काळ बंद ठेवण्यात आली आहे. (हेही वाचा, विमान अपघात : रनवेऐवजी थेट पाण्यात घुसलं विमान, 47 प्रवाशांना बचावण्यात यश)
दरम्यान, हैदराबा-नांदेड-मुंबई- ही विमानसेवाही दोन दिवस बंद ठेवण्यात येऊ शकते. धावपट्टीवरुन विमान घसरण्याची नांदेड विमानतळावरील ही पहिलीच घटना आहे. दरम्यान, धवपट्टीवरुन घसरलेले विमान हे अद्यापही घटनास्थळी तसेच आहे. विविध यंत्रांच्या माध्यमांतून हे विमान धावपट्टीवर घेण्यात येईल. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.