AI-Based Driving Tests: मुंबईसह राज्यात 16 शहरांमध्ये AI-आधारित ड्रायव्हिंग चाचण्या

महाराष्ट्र मोटार वाहन परिवहन विभागाने राज्यातील रस्ते अपघातांचे उच्च प्रमाण आणि वाहतूक शिस्तबद्धतेचे निराकरण करण्यासाठी ड्रायव्हिंग परीक्षांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित चाचण्या सुरू करण्याची योजना जाहीर केली आहे. या चाचण्या मुंबईसह 17 ठिकाणी घेतल्या जातील.

Driving | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Road Accident And Artificial Intelligence: वाहन परवाना हवा आहे? तर तुम्हाला ड्रायव्हींग स्किल म्हणजेच वाहन चालविण्याचे कौशल्य वाढवावे लागेल. होय, जर तुम्ही ते वाढवले नाही तर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित म्हणजेच Artificial Intelligence (AI)-based tests चाचणी तुम्हाला उत्तीर्ण करता येणार नाही. राज्यातील रस्त्यांवर वाढते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठीच महाराष्ट्र मोटार वाहन परिवहन विभागाने राज्यातील रस्ते अपघातांचे उच्च प्रमाण आणि वाहतूक शिस्तबद्धतेचे निराकरण करण्यासाठी ड्रायव्हिंग परीक्षांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित चाचण्या सुरू करण्याची योजना जाहीर केली आहे. या चाचण्या मुंबईसह 17 ठिकाणी घेतल्या जातील. ज्यामध्ये मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी AI सॉफ्टवेअरसह एकत्रित स्वयंचलित ड्रायव्हिंग चाचणी ट्रॅक तयार केले जातील.

पाठिमागच्या वर्षाच्या तुलनेत सन 2022 मध्ये महाराष्ट्रात रस्ते आपघातांचे प्रमाण काहीसे वाढले आहे. हे प्रमाण 0.44% असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे रस्ते अपघात हे राज्याती नागरिकांच्या मृत्यू आणि जखमी होण्याचे मोठे कारण ठरते आहे. जागतिक आरोग्य संघटनेने एका आकडेवारीत म्हटले आहे की, जगभरात अपघाती मृत्यूचे प्रमाण 16.38% ने वाढले आहे. भारताबाबत बोलायचे तर देशातील एकूण मृत्यूंपैकी पाचवा मृत्यू हा अपघातातील असतो. जखमींबाबतही तसेच आहे. या अपघातांमुळे देशाच्या GDP च्या वार्षिक अंदाजे 3% नुकसान होते. रस्त्याच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी ड्रायव्हर्सच्या संवेदनाक्षम आणि मोटर कौशल्यांचे मूल्यमापन करण्याचे महत्त्व अधोरेखित करून, रस्ते अपघातांमध्ये वाहन चालविण्याचे कौशल्य हे प्रमुख योगदान देणारे घटक म्हणून संशोधनाने ओळखले आहे.

मिड डेने दिलेल्या माहितीनुसार, परिवहन विभागाच्या योजनेमध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्वयंचलित ड्रायव्हिंग चाचणी ट्रॅक स्थापन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. हे ट्रॅक सुरक्षित ड्रायव्हिंग कौशल्यांचे वैज्ञानिकदृष्ट्या मूल्यमापन करतील. एआय पॅरामीटर्सच्या आधारे उमेदवारांचे मूल्यांकन करून भ्रष्टाचार दूर करतील. याव्यतिरिक्त, केंद्रीय मोटार वाहन नियम 15 मध्ये निर्दिष्ट केलेल्या 24 चाचणी मूल्यमापन बिंदूंपैकी सात स्वयंचलित असतील. चाचणी ट्रॅक वाहनांच्या तीन वर्गांची पूर्तता करतील: दुचाकी, हलकी मोटार वाहने आणि मध्यम/जड व्यावसायिक वाहने.

काय असेल कृत्रिम AI चाचणीत

चाचण्यांमधील AI एकत्रीकरणामध्ये चेहऱ्याची ओळख आणि अर्जदाराची ओळख यांसारख्या बाबींचा समावेश असेल. रीअल-टाइम ड्रायव्हिंग चाचणीसाठी ट्रॅकसाठी उत्पन्न केले जातील. ज्यामध्ये दैनंदिन जीवनात वाहन हाकताना निर्माण होणारे अडथळे उपलब्ध केले जाती. जसे की, अचानक पादचारी/वस्तू दिसणे. आणिबाणीची स्थिती निर्माण होणे, अशा वेळी चालक काय निर्णय घेतो. वाहन कसे हाकतो याबाबत निरिक्षण केले जाईल. तसेच ट्रॅकमध्ये आठ ट्रॅक, एच-ट्रॅक, ट्रॅफिक सिग्नल चाचण्या, झेब्रा क्रॉसिंग चाचण्या, झिग-झॅग टर्न, ग्रेडियंट चाचण्या आणि दुचाकींसाठी सर्पेन्टाइन ट्रॅक यासह विविध घटकांचा समावेश असेल.

प्राप्त माहितीनुसार एकूण 16 शहरांमध्ये या चाचणीचा प्रयोग केला जाईल. त्यापैकी 17 ठिकाणांपैकी मुंबई सेंट्रलमध्ये दुचाकी वाहनांसाठी दोन आणि हलक्या मोटार वाहनांसाठी एक चाचणी ट्रॅक असेल. ज्यमध्ये इतर ठिकाणी बडनेरा (अमरावती), बुलढाणा, नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, नागपूर पूर्व, नांदेड, अहमदनगर, आळंदी-पुणे, औरंगाबाद, हडपसर-पुणे, जळगाव, सासवड-पुणे, कोल्हापूर, नांदिवली ठाणे, पनवेल आणि पेण यांचा समावेश आहे.

या प्रकल्पाची उद्दिष्टे अर्जदारांच्या सुरक्षित ड्रायव्हिंग कौशल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या मूल्यमापन करणे, कमीतकमी मानवी हस्तक्षेपासह एक कार्यक्षम आणि पारदर्शक प्रणाली स्थापित करणे, ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्यासाठी प्रतीक्षा कालावधी कमी करणे, योग्य ड्रायव्हिंग प्रशिक्षणास प्रोत्साहन देणे आणि वाहतूक आणि वाहन चालविण्याच्या नियमांबद्दल जागरूकता वाढवणे हे आहेत. आणि राज्य एमव्ही नियम.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now