अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणूक 2019: अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री घुले तर, उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या प्रताप शेळके यांची बिनविरोध निवड; भाजपची सपशेल माघार
शेवटच्या क्षणापर्यंत निवडणुकीतील उत्सुकता कायम असतानाच भाजप उमेदवारांनी अचानकपणे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे सामना लढाईच्या माध्यमातून न सुटता एकतर्फीच निकाल लागला.
Ahmednagar Zilla Parishad Presidential Election 2019: अहमदनगर जिल्हा परिषद (Ahmednagar Zilla Parishad) अध्यक्षपद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या राजश्री घुले (Rajashree Ghule) तर उपाध्यक्ष पदावर काँग्रेस (Congress Party) पक्षाच्या प्रताप शेळके (Pratap Shelke) यांची निवड होण्याची केवळ औपचारिकता बाकी उरली आहे. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून भाजप (BJP) उमेदवार सुनीता खेडकर तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून संध्या आठवले यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने राष्ट्रवादीच्या घुले आणि शेळके यांचा अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावर बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राजश्री घुले यांची तर उपाध्यक्ष पदी काँग्रेस पक्षाच्या प्रताप शेळके यांची नावे आघाडीने निश्चित केली होती. दरम्यान, भाजपनेही आपले उमेदवार रिंगणात उतरवल्याने चुरस वाढली होती. शेवटच्या क्षणापर्यंत निवडणुकीतील उत्सुकता कायम असतानाच भाजप उमेदवारांनी अचानकपणे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे सामना लढाईच्या माध्यमातून न सुटता एकतर्फीच निकाल लागला. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदावर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडूण येणार आहेत. (हेही वाचा, सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक 2019; मोहिते पाटील प्रणित भाजप गटाचा अध्यक्ष पदावर झेंडा, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला धक्का)
दरम्यान, सभागृहातील संख्याबळाचा विचार करता महाविकासआघाडीचे पारडे जड होते. राष्ट्रवादी, काँग्रेस, सेना आणि क्रांतीकारी शेतकरी पक्ष महाविकासआघाडी सोबत असल्याने त्यांच्याकडे बहुमतापेक्षाही अधिक संख्याबळ होते. दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीतही एकत्र दिसल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री घुले या अध्यक्ष, तर काँग्रेसचे प्रताप शेळके उपाध्यक्षपदावर विराजमान होणार आहेत. या बदलत्या राजकारणाची जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.