अहमदनगर: श्रीपाद छिंदम याचं नगरसेवकपद रद्द; ठाकरे सरकारचा दणका
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्याने वादाच्या भोवर्यात अडकलेल्या श्रीपाद छिंदम (Shripad Chindam) यांचं नगरसेवकपद रद्द करण्यात आलं आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्याने वादाच्या भोवर्यात अडकलेल्या श्रीपाद छिंदम (Shripad Chindam) यांचं नगरसेवकपद रद्द करण्यात आलं आहे. दरम्यान आज नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासमोर ही सुनावणी करण्यात आली आहे. त्यामुळे हा ठाकरे सरकारचा मोठा दणका असल्याचं समजलं जात आहे. श्रीपाद छिंदम हे भाजप पक्षाचे अहमदनगरचे उपमहापौर झाले होते. उपमहापौर पदी (Dy Mayor) असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरले होते. त्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. श्रीपाद छिंदम अहमदनगमधून तडीपार; छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काढले होते अनुद्गार.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्याने तत्कालीन महासभेने छिंदम यांचे नगरसेवकपद रद्द केले होते. या निर्णयावर सरकारकडून शिक्कामोर्तब करण्यासाठी त्याबाबतचा ठराव मंत्रालयात पाठवण्यात आला होता. दरम्यान मागील दीड वर्षांपासून याबाबत सुनावणी सुरू होती. आज महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर काल सुनावणी पार पडली. आज त्याच्या अंतिम निकालाची सुनावणी करताना छिंदमचं नगरसेवकपद रद्द करण्यात आलं आहे.
मागील वर्षी झालेल्या अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये श्रीपाद छिंदम पुन्हा उभा राहिला होता. अपक्ष उभ्या राहिलेल्या छिंदमचा निवडणुकीत विजयही झाला. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या फोटोला अभिवादन करत त्याने प्रायश्चित्त घेत असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान त्यानंतर बसपच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक देखील लढली मात्र त्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला.