अहमदनगर: बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी नवरा-बायकोला विवस्त्र करून मारहाण; अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात 2016 साली एका विवाहितेवर बलात्कार (Rape) झाला होता, आता त्याच गुंडांकडून ही पीडित आणि तिचा पती यांना विवस्त्र करून अमानुष मारहाण करण्यात आल्याचे समजत आहे, इतकेच नव्हे तर या दामपत्याच्या अंगावर पेट्रोल टाकून या गुंडांकडून जाळण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला

प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात 2016 साली एका विवाहितेवर बलात्कार (Rape)  झाला होता, याप्रकरणी तोफखाना येथील पोलीस स्थानकात आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र आता 4 वर्ष उलटून गेल्यावर अजूनही पोलिसांकडून या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही, यामुळे अगोदरच संबंधित पीडितेला आणि तिच्या परिवाराला नाहक त्रास सहन करावा लागत होतामी यात भर म्हणून, आता त्याच गुंडांकडून ही पीडित आणि तिचा पती यांना विवस्त्र करून अमानुष मारहाण करण्यात आल्याचे समजत आहे, इतकेच नव्हे तर या दामपत्याच्या अंगावर पेट्रोल टाकून या गुंडांकडून जाळण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी तूर्तास पोलिसांनी कलम 307 अंतर्गत गुन्हा नोंदवून घेतला आहे, मात्र दुसरीकडे या गुंडाना पोलिसांचा देखील पाठिंबा असल्याचा धक्कादायक दावा पीडितेकडून करण्यात येत आहे.निर्भया प्रकरणातील दोषींची फाशी पुन्हा टळली; दिल्ली कोर्टाचा निर्णय

प्राप्त माहितीनुसार, काही गुंडानी बलात्कार पीडित महिला आणि तिच्या पाटील भर रस्त्यात गाठून त्यांना विवस्त्र करून मारहाण केली, त्यांच्या नागावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला, तसेच या कृत्याचा व्हिडीओ काढून जर का बलात्काराचा गुन्हा मागे घेतला नाही तर हा व्हिडीओ व्हायरल करू अशी धमकी दिली.तसेच, पीडित महिलेच्या नवऱ्याचं वीर्य काढून त्याच्याचविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल, करु अशीही धमकी आरोपींनी दिली होती. याबाबत पोलिसांकडे वाच्यता करणार नसल्याचा शब्द दिल्यावर मगच या गुंडानी या दाम्पत्याला सोडले.

तेलंगणा: 90 वर्षांच्या वृद्धेवर नराधमाने बलात्कार करून केला खून

दरम्यान, पीडित दाम्पत्याने पोलिसांना या प्रकरणी माहिती दिल्यावर सुद्धा तक्रार नोंदवून घेण्यासाठी टाळाटाळ केली जात होती मात्र विरोधी पक्षाकडून याबाबत दबाव टाकल्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा नोंदवून घेतला आहे, दुसरीकडे या गुंडानी या मारहाणीच्या प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला असून यामध्ये, त्या दोघांनाही विवस्त्र करून हात पाय तोंड बांधून पीडितांना पट्ट्याने मारहाण होताना दिसत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement