अहमदनगर: Crime Petrol पाहून प्रेयसीचा प्रियकरावर अॅसिड हल्ला; आरोपी युवतीला अटक

विशेष म्हणजे प्रियकरावर अॅसिड हल्ला करण्याची कल्पना आपल्याला क्राईम पेट्रोल (Crime Patrol) पाहून सूचल्याचेही तिने कबूल केले आहे. युवतीने दिलेल्या कबुलीजबाबानंतर पोलीसही चकीत झाले.

(Photo credit: archived, edited, representative image/ pixabay)

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात खळबळ उडवूण देणाऱ्या प्रियकर अॅसिड हल्ला (Acid Attack) प्रकरणाला धक्कादायकरित्या कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणी आरोपी युवतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी युवतीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून, प्रियकराचा बदला घेण्यासाठीच आपण हे कृत्य केल्याचे तिने म्हटले आहे. विशेष म्हणजे प्रियकरावर अॅसिड हल्ला करण्याची कल्पना आपल्याला क्राईम पेट्रोल (Crime Patrol) पाहून सूचल्याचेही तिने कबूल केले आहे. युवतीने दिलेल्या कबुलीजबाबानंतर पोलीसही चकीत झाले.

प्राप्त माहितीनुसार, अहमदनगर जिह्यातील अष्टी तालुक्यात (Ashti Taluka)राहणाऱ्या अमीर या मुलाचे नगर येथेच शिकत असलेल्या 21 वर्षीय युवतीसोबत प्रेमसंबंध होते. ही युवती नारायण डोह येथील राहणारी असल्याचे समजते. युवतीचे नाव अद्याप समजू शकले नाही. आरोपी युवती ही अमीर याच्याकडे विवाहासाठी तगादा लावत होती. विवाहाच्या मुद्द्यावरुन दोघांमध्ये नेहमीच कडाक्याचे भांडण होत असे.

दरम्यान, एके दिवशी (सोमवारी) दोघांमध्ये विवाहावरुन असेच कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर आरोपी युवतीने आमिर याला तोरणा हॉटेल येथे बोलावले. तेथे तिने त्याला पुन्हा एकदा विवाहासाठी विचारले. मात्र, पुन्हा त्यांच्यात वाद सुरु झाला. हा वाद सुरु असताना युवतीने सोबत आणलेल्या अॅसिडचा आमिर याच्यावर अचानक हल्ला केला. यात आमिर बराच जखमी झाला. (हेही वाचा, अहमदनगर येथील आंतरजातीय विवाहाला नवे वळण, पतीनेच पत्नीला जाळले, भावंडांकडून धक्कादायक खुलासा)

अॅसिड हल्ला प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यावर पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांना घटनास्थळार लेडीज चप्पल आणि इतर वस्तू आढळल्या. त्यावरुन तर्क लढवत पोलिसांना आमिर याच्या प्रेयसिला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने आपण केलेल्या कृत्याची कारणासही कबुली दिली. दरम्यान, तरुणीने हल्ला करण्यासाठी अॅसिड कोठून आणले याबाबत पोलीस तपास सुरु आहे. प्राप्त माहितीनुसार, सदर युवतीचे वडील नगरमधील एका टेलरींग दुकानात काम करतात. तर, आरोपी युवती एमएस्सीचे शिक्षण घेत आहे.