कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी दिला शिवजयंती 2020 निमित्त पर्यावरण पुरक संकल्प करण्याचा सल्ला, पहा ते काय म्हणाले?
यंदा या शिव जन्म सोहळ्याचं औचित्य साधात देशात गल्ली पासून दिल्ली पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर यामध्ये इंदुरीकर महाराजांनी शिवजयंती सेलिब्रेशनमध्ये शिवरायांचे स्वप्न साकार करण्याचे आवाहन शिवभक्तांना केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 390 व्या जयंती निमित्त महाराष्ट्रासह देशात- परदेशामध्ये तयारी अंतिम टप्पात आली आहे. दरम्यान सध्या वादाच्या भोवर्यात अडकलेल्या इंदुरीकर महाराजांंनी शिवजयंती 2020 च्या निमित्ताने मृत व्यक्तीच्या पार्थिवाची राख नदी ऐवजी झाडात टाकण्याचा संकल्प करण्याचा सल्ला दिला आहे. 'एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याची राख शेतात टाका. शेतात नसेल तर घरी घेऊन ती झाडाच्या कुंडीत टाका. गावातला माणूस गावात सुखाने जगेल हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं. नदी स्वच्छ होईल. शिवार झाडांनी भरुन जाईल, शिवरायांचं स्वप्न साकार होईल'. असं त्यांनी म्हटलं आहे. काल (17 फेब्रुवारी) पुण्यामधील मोशी गावात इंदुरीकर महाराजांच्या कीतर्नाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळेस मोशीकर्यांनी इंदुरीकर महाराजांची गावाच्या वेशीपासून बैलगाडीमधून गाजत वाजत मिरवणूक काढली होती. Shiv Jayanti 2020 Date: शिवजयंती 19 फेब्रुवारी दिवशी साजरा करण्याचा इतिहास व महत्त्व काय?
शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी दिवशी साजरी केली जाते. यंदा या शिव जन्म सोहळ्याचं औचित्य साधात देशात गल्ली पासून दिल्ली पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर यामध्ये इंदुरीकर महाराजांनी शिवजयंती सेलिब्रेशनमध्ये शिवरायांचे स्वप्न साकार करण्याचे आवाहन शिवभक्तांना केले आहे. (हेही वाचा - किर्तनकार इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल होणार? गर्भलिंग निदानाच्या 'ऑड-इव्हन' फॉर्म्युल्यासंदर्भात केलं 'हे' वादग्रस्त विधान).
शिवाजी महाराजांप्रमाणेच संत ज्ञानेश्वर महाराज देखील झाडं लावण्याचा सल्ला देत असतं असं सांगताना इंदुरीकर महाराजांनी झाडाला एक वर्ष पाणी घातलं तर झाड माणसाला आयुष्यभर सेवा देईल. शाळेत जाणाऱ्यांनी शाळेत एक झाड लावावं, सासरी आलेल्या मुलीने बापाच्या आठवणीत एक झाड लावावं, माहेरी आलेल्या लेकीने आपली आठवण म्हणून झाड लावावं, ग्राम पंचायत सदस्यांनी निवडून आलो म्हणून प्रत्येक वॉर्डमध्ये 2 झाडं लावावी असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
इंदुरीकर महाराजांनी आपल्या एका किर्तनामध्ये लोकांना गर्भलिंगाविषयीचा 'ऑड-इव्हन फॉर्म्युला' सांगितला होता. 'सम संख्येला संग केल्यास मुलगा जन्माला येईल. तर विषम तारखेला संबंध आल्यास मुलगी जन्माला येईल,' असं इंदोरीकरांनी आपल्या किर्तनात म्हटल्यानंतर सध्या त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. दरम्यान या वादग्रस्त विधानावरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी वाढत आहे.