Pune Traffic Diversion Advisory: नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल; पहा कोणते रस्ते राहणार बंद आणि पर्यायी व्यवस्था
हा बदल दुपारी 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत करण्यात आला आहे. त्यामुळे आज पुणेकरांनी बाहेर पडताना काळजी घेणं आवश्यक आहे.
Pune Traffic Diversion Advisory on 17 October: नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज विधानसभा निवडणूकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Elections) प्रचारासाठी पुण्यात दाखल होणार आहेत. या सभेच्या पार्श्वभूमीवर आज (17 ऑक्टोबर) दिवशी पुण्यामध्ये वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. पुणे शहर ट्राफिक विभागाकडून आज काही रस्ते पुणेकरांसाठी बंद करण्यात आले आहेत तसेच काही मार्गांवरून पर्यायी मार्गांवरून वाहतूक वळवण्यात आली आहे. हा बदल दुपारी 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत करण्यात आला आहे. त्यामुळे आज पुणेकरांनी बाहेर पडताना काळजी घेणं आवश्यक आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: नरेंद्र मोदी घेणार आज सातारा, पुणे आणि परळी मध्ये प्रचार सभा.
आज पुणे शहरात कशी असेल वाहतूक व्यवस्था?
महाराष्ट्र्रामध्ये 288 विधानसभा मतदारसंघामध्ये 21 ऑक्टोबर दिवशी मतदार होणार आहे. एकाच टप्प्यात होणार्या या मतदानाचा निकाल 24 ऑक्टोबर दिवशी लागणार आहे.