महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: नरेंद्र मोदी घेणार आज सातारा, पुणे आणि परळी मध्ये प्रचार सभा

भाजपाच्या उमेदवारांसाठी पंतप्रधानांनी नऊ सभांचं आयोजन केलं आहे.

PM Narendra Modi (Photo credits: ANI)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Vidhan Sabha Elections)  ची प्रचार आता अंतिम टप्प्यांत येऊन पोहचला आहे. सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देखील उतरले आहेत. आज (17 ऑक्टोबर) दिवशी मोदी सातारा, पुणे आणि परळी विधानसभा मतदार संघांमध्ये प्रचार सभा घेणार आहेत. भाजपाच्या उमेदवारांसाठी पंतप्रधानांनी नऊ सभांचं आयोजन केलं आहे. उदया (18 ऑक्टोबर) दिवशी मोदी मुंबईत सभा घेणार आहेत.

नरेंद्र मोदी यांनी काल (17 ऑक्टोबर) नवी मुंबई सह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये प्रचार केला. त्यावेळेस कश्मीर मधील कलम 370 वरून विरोधकांकडून होणार्‍या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. रोधकांना देशात दुफळी हवी आहे. आम्ही तसे होऊ देणार नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा कलम 370 चा नारा दिला. सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेवर भाजपा- शिवसेना पक्षाची सत्ता आहे. 2014 च्या विधानसभेमध्ये भाजपाचे 122 आमदार निवडून आले होते. 'डूब.. डूब के मरो'; कलम 370 मुद्यावरुन अकोला येथील सभेत पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांना टोला.

महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा मतदार संघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. हे मतदान 21 ऑक्टोबर दिवशी पार पडेल. तर 24 ऑक्टोबर दिवशी निवडणूक निकाल जाहीर केला जाणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif