Mumbai Traffic Update: महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मध्ये 3 दिवसांसाठी वाहतूक मार्गात बदल; 12 विशेष लोकल धावणार

महापरिनिर्वाण दिनी रस्ते वाहतूकीमधील बदल करत ते वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

Mumbai Traffic Police. Representative Image. (Photo Credits: PTI)

डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. B R Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din) मुंबई मध्ये 6 डिसेंबर दिवशी मोठ्या प्रमाणात अनुयायी मुंबई मध्ये दाखल होतात. त्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाकडून काही मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर असे तीन दिवस हे वाहतूक बदल लागू असणार आहेत. 5 डिसेंबरला पहाटे 6 वाजल्यापासून 7 डिसेंबर दिवशी मध्यरात्रीपर्यंत हे बदल लागू असणार आहेत. त्यामध्ये काही मार्ग वाहतूकीसाठी बंद असतील तर काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे.

महापरिनिर्वाण दिनी रस्ते वाहतूकीमधील बदल

महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर दादर मध्ये वीर सावरकर रोड हा सिद्धिविनायक मंदिर जंक्शन पासून हिंदुजा हॉस्पिटल पर्यंत बंद असेल. सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते पोर्तुगीज चर्च या भागामध्ये एस के बोले मार्गावरील वाहतूक एकमार्गीच सुरू राहणार. रानडे रोड, ज्ञानेश्वर मंदिर रोड, जांभेकर महाराज रोड, एमबी राऊत रोड, केळुस्कर रोड (दक्षिण) आणि (उत्तर) बंद राहणार आहेत. एलजे रोड ते आसावरी जंक्शनपर्यंत कटारिया रोड बंद राहणार आहे. एसव्हीएस रोड, एलजे रोड, गोखले रोड, सेनापती बापट रोड आणि टिळक पुलावरून एनसी केळकर रोडच्या दिशेने जड वाहनांना प्रवेश बंदी असेल. 5 ते 7 डिसेंबर या कालावधीत एमबी राऊत रोड, वीर सावरकर रोड, ज्ञानेश्वर मंदिर रोड, रानडे रोड, केळुस्कर रोड दक्षिण आणि उत्तर या मार्गावर पार्किंग करण्यास मनाई असेल. नक्की वाचा: Mumbai: दादर फुले मार्केटमधील दुकाने पाडण्यास मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती .

महापरिनिर्वाण दिन निमित्त विशेष ट्रेन

महापरिनिर्वाण दिना निमित्त मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर 12 विशेष लोकल ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. तर 14 लांब पल्ल्याच्या देखील विशेष ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. दरम्यान मुंबई मध्ये या दिवसाची गर्दी पाहता दादर मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांना पूर्व-पश्चिम बाजूने जोडणाऱ्या पुलावरील शहराच्या हद्दीतून दादर रेल्वे स्थानकाकडे जाणारे सर्व प्रवेशद्वार फलाट क्र. 6 लोकांसाठी बंद राहील. पूर्व-पश्चिम बाजूने शहराच्या हद्दीतून बाहेर पडण्यासाठी उपनगरीय किंवा मेल गाड्यांद्वारे दादर स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांसाठी आणि एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी हा पूल खुला असेल. 'सुविधा' कडून पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्म नंबर1 कडे जाण्यासाठी बंद असणार आहे.

दरवर्षी 6 डिसेंबरला महामानवाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यंदा देखील देशभरातून भीमसैनिक दादर येथील चैत्यभूमीवर दाखल होणार आहेत.