APMC Election 2023 Result: परळी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांची आघाडी, भोरमध्ये काँग्रेसला आघाडी
त्यापैकी 95 बाजार समित्यांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
ग्रामीण राजकारणाचं केंद्र समजल्या जाणाऱ्या राज्यातील 147 बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. त्यापैकी 95 बाजार समित्यांच्या मतमोजणीला (APMC Election 2023) सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी आज मतदान होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये भाजप (BJP)आणि शिवसेना (Shivsena) विरुद्ध महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadhi) असा थेट सामना पाहायला मिळतोय. मतदारांनी नेमका कोणाला कौल दिलाय हे आज स्पष्ट होणार आहे. तर 34 बाजार समित्यांची कालच मतमोजणी झाली आहे.
परळी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक ही धनजंय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली होती. या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या उमेदवरांने आघाडी घेतल्याचे पहायला मिळत आहे. या ठिकाणी धनजंय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर मात केल्याचे दिसून आले. भूम बाजार समितीमध्ये 18 पैकी 11 जागेवर मंत्री तानाजी सावंत यांच्या पॅनलचे उमेदवारांवर विजय प्राप्त केला. बीड जिल्ह्यातील केज,अंबाजोगाई आणि गेवराई बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आघाडी घेतली आहे.
पुण्याच्या भोर कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस आमदार संग्राम थोपटेंनी आपला गड राखला आहे. भोर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसने एकहाती सत्ता राखली आहे. काँग्रेस विरुद्ध सर्व पक्ष एकत्र लढल्यानंतरही 18 पैकी 18 जागांवर काँग्रेसने विजय प्राप्त केला आहे. निवडणूकीमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना पक्ष एकत्र लढूनही काँग्रेसचं वरचढ ठरली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 7 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल घोषित झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात महाविकास आघाडीने या निवडणुकीत बाजी मारली, तर भाजपा आणि शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.