Agri Malvani Jatra: कोविड19 च्या नियमांचे उल्लंघन केल्याने KDMC कडून आग्री मालवणी जत्रा रद्द

परंतु या जत्रेवेळी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून ती रद्द करण्यात आली आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: @FeminaIndia)

Agri Malvani Jatra: डोंबिवलीतील भगशाळा मैदानावर आग्री मालवणी जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या जत्रेवेळी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून ती रद्द करण्यात आली आहे. ही जत्रा 28 डिसेंबर पासून सुरु झाली आणि 12 जानेवारीला संपणार होती. जत्रेसाठी मैदानात स्टॉल उभे करण्यासाठी खड्डे खोदले गेले होते. परंतु या मैदानाच्य नुतनीकरणाचे काम मनसेचे वरिष्ठ नेते प्रल्हाद म्हात्रे यांनी केले होते. त्यामुळे त्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे जत्रेसाठी दिल्या गेलेल्या परवानगी नंतर आयोजकाने तेथे नुकसान केल्याची तक्रा म्हात्रे यांनी केली.

तक्रार मिळाल्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेचे पथक जत्रेच्या ठिकाणी पोहचले. तेथे नागरिकांकडून कोविड19च्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. त्यामुळेच महापालिकेकडून आग्री मालवणी जत्रा ही रद्द करण्यात आली.(Fresh Guidelines For International Travellers at Mumbai International Airport: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर परदेशातून येणार्‍यांना अशी असेल नवी नियमावली)

दरम्यान, मुंबईसह संपूर्ण राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यात कठोर निर्बंध लावण्यासंबंधित आज एक महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, टास्क फोर्स, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अन्य काही अधिकारी उपस्थितीत राहणार आहेत.

तसेच महापौर किशोरी पेडणेकर यांनी असे म्हटले की, लॉकडाउन नको असल्यास कोविड19च्या नियमांचे पालन करा. मास्क लावा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे आवाहन ही त्यांनी केले आहे. ज्या दिवशी शहरात 20 हजारांहून अधिक रुग्ण आढळण्यास सुरुवात होईल, त्याच वेळी शहरात लॉकडाउन किंवा मिनी लॉकडाउन लावण्याची गरज भासू शकते. या व्यतिरिक्त ज्या इमारतीत 20 टक्क्यांहून अधिक रुग्ण मिळाल्यास ती पूर्णपणे सील केली जाईल.