Coronavirus In Aurangabad: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह इतर प्रमुख शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद (Aurangabad) प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोनाने (Coronavirus) डोके वर काढले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह इतर प्रमुख शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद (Aurangabad) प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात येत्या 17 मार्च सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 4 एप्रिलपर्यंत रेस्टॉरंट, हॉटेल, परमीट रूम, नाश्ता सेंटर, धाबे, फूड पार्क, फन पार्क आणि रिसॉर्टमधील डायनींग सुविधा बंद ठेवण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
औरंगाबादेत कोरोना रुग्णांच्या संख्या सातत्याने वाढ होत आहे. यामुळे जिल्ह्यातील जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था (कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था) व इतर तत्सम संस्था बंद राहतील. सर्व प्रकारच्या धार्मिक सभा, राजकीय सभा, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रम, रॅली, मिरवणुका, आंदोलने, मोर्चे, धरणे, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम यावर प्रतिबंध लावण्यात आले आहे. याशिवाय, आठवडी बाजार, जलतरण तलाव क्रीडा स्पर्धा, सर्व प्रकारची सभागृहे, मंगल कार्यालये, लॉन्स पूर्णपणे बंद राहतील. तसेच कोणत्याही सार्वजनिक विवाह समारंभास परवानगी नाकारली आहे. हे देखील वाचा- Maharashtra: मुंबईतील दादर मार्केटमध्ये आज सकाळी प्रचंड गर्दी
औरंगाबाद जिल्ह्यात काल (14 मार्च) 1 हजार 23 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 57 हजार 701 वर पोहचली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 1 हजार 339 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एकूण 51 हजार 381 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यात 4 हजार 981 रुग्ण सक्रीय आहेत.