मुंबईच्या टिळक नगर परिसरात पुन्हा एकदा आग; अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल

आज संध्याकाळी परत याच टिळक नगर परिसरात आग लागल्याची घटना घडली आहे. इमारत क्रमांक 50 च्या ए विंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर ही लाग लागल्याचे समोर येत आहे

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

काही दिवसांपूर्वीच मुंबई येथील टिळक नगर (Tilak Nagar) परिसरात भीषण आग लागली होती. या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना अजूनही ताजी असताना आज संध्याकाळी परत याच टिळक नगर परिसरात आग लागल्याची घटना घडली आहे. इमारत क्रमांक 50 च्या ए विंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर ही लाग लागल्याचे समोर येत आहे. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरु आहे. ही आग नेमकी कशी लागली याबाब्दल काही ठोस कारण पुढे येऊ शकले नाही. (हेही वाचा : चेंबूर येथे रहिवासी इमारतीला आग; 5 जण ठार)

नुकतीच टिळक नगर येथील सरगम सोसायटीच्या 11 व्या मजल्यावर आग लागली होती. या आगीत पाच जणांचा मृत्य झाला होता. पोलिसांनी चौकशी सुरु केली असता, या इमारतीचा रिफ्युजी परिसर 18 लाख रुपयांना विकला गेला असल्याचे दिसून आले होते. तसेच या इमारतीत अग्निशमन यंत्रणा योग्य प्रकारे कार्यान्वित नव्हती. त्यामुळे ही आग वाढत गेली. आता परत याच परिसरात आग लागल्याने लोकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. याबाबत पालिकेने लवकरात लवकर काही ठोस पावले उचलायला हवीत अशे मागणी परिसरातील लोकांकडून करण्यात येत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement