Uddhav Thackeray on Dharavi Slum Redevelopment Project: सत्तेत आल्यानंतर धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा रद्द करणार; उद्धव ठाकरे यांचे आश्वासन

ती आता रद्द का करू नये, याचे उत्तर सरकारने द्यावे. आम्ही मुंबईला अदानी शहर होऊ देणार नाही. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचा प्रकल्प आहे.

Uddhav Thackeray | (Photo Credits: X)

Uddhav Thackeray on Dharavi Slum Redevelopment Project: सत्तेत आल्यानंतर धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा (Dharavi Slum Redevelopment Project) रद्द करू, असं आश्वासन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना हे वक्तव्य केलं. धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा उद्योगपती गौतम अदानी यांच्या फर्मला देण्यात आली आहे. एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना ठाकरे म्हणाले की, त्यांचा पक्ष धारावीतील रहिवासी आणि त्यांचे व्यवसाय बंद होणार नाहीत याची खात्री करेल. तसेच तेथे राहणाऱ्या लोकांना त्या परिसरातच 500 चौरस फुटांची घरे देण्यात येतील.

पीटीआयच्या वृत्तानुसार, पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही सत्तेत आल्यानंतर धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा रद्द करू. ती आता रद्द का करू नये, याचे उत्तर सरकारने द्यावे. आम्ही मुंबईला अदानी शहर होऊ देणार नाही. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचा प्रकल्प आहे. (हेही वाचा - Amit Thackeray On Uddhav Thackeray: 'बिनशर्ट पाठिंबा' वरून उद्धव ठाकरे यांनी उडवलेल्या खिल्लीला अमित ठाकरे यांच्याकडून थेट उत्तर! (Watch Video)

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. महाराष्ट्रात मागील विधानसभा निवडणुका ऑक्टोबर 2019 मध्ये झाल्या होत्या. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सरकार स्थापनेसाठी बहुमत मिळवले. परंतु, अंतर्गत संघर्षामुळे शिवसेनेने युती सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेससह महाविकास आघाडीची नवीन आघाडी स्थापन केली. त्यानंतर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. (हेही वाचा - Shankaracharya Avimukteshwaranand On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्यासोबत 'विश्वासघात' झाला; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद)

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत श्वेतपत्रिका आणण्याचे आश्वासन दिले असतानाच शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या प्रकल्पावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी माजी खासदार डॉ. गोपाळ शेट्टी यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना पत्र लिहून केली होती. त्यांनी एसआरएच्या कार्यक्षमतेवर चिंता व्यक्त करत योजनेंतर्गत झालेल्या सर्व कामांची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे. विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकल्पात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केल्यानंतर विखे-पाटील यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत श्वेतपत्रिका मांडण्याची घोषणा केली होती.