Shraddha Walker Murder Case: एकीचा मृतदेह फ्रीजमध्ये कोंबून दुसरी सोबत त्याच फ्लॅटवर डेट, श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आफताब पूनावाला याचे धक्कादायक कृत्य उघड

अफताब पूनावाला याने त्याची लिव्ह-इन (Live in Relationship) प्रेयसी श्रद्धा वालकर (Shraddha Walker) हिची कथीतरित्या हत्या केली. इतकेच नव्हे तर श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन तो फ्रीजमध्ये ठेवला.

Shraddha Walker | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

श्रद्धा वालकर हत्या (Shraddha Walker Murder Cas) प्रकरणात तिचा प्रियकर आफताब अमीन पूनावाला (Aftab Poonawalla) याच्याकडून धक्कादायक माहिती उघड होऊ लागली आले. अफताब पूनावाला याने त्याची लिव्ह-इन (Live in Relationship) प्रेयसी श्रद्धा वालकर (Shraddha Walker) हिची कथीतरित्या हत्या केली. इतकेच नव्हे तर श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन तो फ्रीजमध्ये ठेवला. तो फ्रीज ज्या फ्लॅटमध्ये होता त्याच फ्लॅटमध्ये तो दुसऱ्या एका तरुणीला बोलवून तिच्याशी त्याने डेट केल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात पोलिसांनी आफताब याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला. आफताब याने श्रद्धा वालकर हिची दिल्लीतील एका अपार्टमेंटमध्ये हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह त्याच अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये फ्रीजमध्ये ठवेला. धक्कादायक म्हणजे त्याने त्याच फ्लॅटमध्ये आणखी एका महिलेला डेटसाठी आणले. पुढच्या काही काळात त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे दिल्लीभर वेगवेळ्या ठिकाणी फेकले. (हेही वाचा, Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा वालकरच्या खून प्रकरणावर 'लव्ह जिहाद' चा संशय मुलीच्या वडिलांकडून व्यक्त; Aftab ला मृत्यूदंड व्हावा याची मागणी)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब याने दिल्ली येथील अपार्टमेंटमध्ये आणलेली दुसरी महिला त्याला 'Bumble' (बंबल) नावाच्या डेटींग अॅपवरुन भेटली होती. श्रद्धा आणि त्याची ओळखही एका डेटींग अॅपवरुनच झाली होती. आफताब याच्याविषयीचा अधिक तपशील पोलीस Bumble एॅपकडेही विचारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ट्विट

वय वर्षे 28 असलेल्या आफताबने बंबलवरुनच 26 वर्षीय श्रद्धा वालकरची भेट घेतली होती. मुंबईत सुरू झालेला रोमान्स मे महिन्यात दिल्लीत एका भीषण हत्याकांडात संपण्यापूर्वी ते तीन वर्षे एकत्र होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif