African Sex Racket Busted In Navi Mumbai: नवी मुंबईत आफ्रिकन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; तिशीतील 8 महिलांची सुटका
सुटका करण्यात आलेल्या सर्व महिला आफ्रिकनच असूनत्या 25 ते 30 वयोगटातील असल्याचे समजते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (10 एप्रिल) रात्री नऊच्या सुमारास नवी मुंबईतील खारघर परिसरातील एका रो-हाऊसवर छापा टाकण्यात आला.
नवी मुंबई (Navi Mumbai) शहरातील खारघर येथे सुरु असलेले आफ्रिकन सेक्स रॅकेट नवी मुंबई (African Sex Racket Busted In Navi Mumbai) पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. पोलिसांनी छापा टाकून केलेल्याकारवाईत आठ महिलांची सुटका करण्यात आली तर दोघींना ताब्यात घेण्यात आले. सुटका करण्यात आलेल्या सर्व महिला आफ्रिकनच असूनत्या 25 ते 30 वयोगटातील असल्याचे समजते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (10 एप्रिल) रात्री नऊच्या सुमारास नवी मुंबईतील खारघर परिसरातील एका रो-हाऊसवर छापा टाकण्यात आला. आफ्रिकेतील काही स्त्रिया रो हाऊसमध्ये देहव्यापार चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या वेळी दोन आफ्रिकन महिलांना ताब्यात घेण्यात आले. एक महिला कारवाईवेळी पळून जाण्यात यशस्वी झाल्याची माहिती प्राथमिक चौकशीत पुढे आल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.
दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजीव शेजवाल यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, सेक्स रॅकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या व प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्व आठ आफ्रिकन महिलांची सुटका करण्यात आली आहे. या सर्व महिलांना सध्या सुधारगृहामध्ये दाखल करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींवर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये मानवी तस्करी (IPC कलम 370), गुन्हेगारी कट रचणे (IPC कलम 120B) आणि अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायदा अशा विविध कायदा आणि आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा, Sex Racket Busted in Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवड येथील वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश, 3 महिलांची सुटका; स्पा मालकास अटक)
दरम्यान, अलिकडील काही काळात असा प्रकारची रॅकेट्स वाढली आहे. अलिकडेच पुणे पोलिसांनी पिंपरी-चिंचवडमधील हिंजवडी परिसरात स्पा पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचे रॅकेट उद्ध्वस्त केले. याकारवाईत पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी युनिटने (एएचटीयू) टाकलेल्या छाप्यात तीन महिलांची सुटका करण्यात आली असून स्पा मालकासह दोन पुरुषांना अटक करण्यात आली आहे. (हेही वाचा, Jalgaon Sex Racket : जळगावमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दफाश; ६० तरूणींची सुटका, 10 महिलांसह 5 दलालांना अटक)
हिंजवडी येथील ब्रेथ स्पामध्ये कथितरित्या चालवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर कारवाया एएचटीयूने सुरू केलेल्या अचानक छाप्यामध्ये उघडकीस आल्या. मानवी तस्करी आणि संबंधित गुन्ह्यांचा मुकाबला करण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी अनेक प्रयत्न सुरु ठेवले आहेत. जेणेकरुन बेकायदेशीर आणि मानवी मुल्ल्यांचे उल्लंघन करणाऱ्या विविध व्यवसाय, कृती आणि व्यवस्थांना सुरुंग लावता येईल. विविध घटनांमधुन अनेकदा पुढे आले आहे की, अशा प्रकारच्या घटना खूप उशीरा पुढे येतात. सुरुवातीला लोकांना या प्रकरणाची कोणतीच माहिती मिळत नाही. अचानक एके दिवशी पोलिसांना माहिती मिळते आणि मग कारवाई केल्याचे पुढे येते.