मुख्यमंत्र्यांवर सतत निशाणा साधणा-या ट्रोलर्सला आदित्य ठाकरे यांनी अशा शब्दांत दिले प्रत्युत्तर
कायदा हातात घेणे हे आपले काम नाही. पोलिसांचे काम आहे. त्यामुळे ट्रोल करणा-यांकडे दुर्लक्ष करुन शांत राहणे असा सल्ला आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला आहे.
राज्यातील सत्तासंघर्षानंतर ठाकरे सरकार स्थापन झाल्यावर अनेक चर्चांना उधाण आले आणि सर्वांचे टिकेचे लक्ष्य ठरले ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. या ना त्या कारणाने त्यांच्यावर टिका होतच राहिली. कधी कोणत्या निर्णयासाठी, घोषणेसाठी किंवा अगदी सरकार स्थापन केल्या बद्दलही. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर सोशल मिडियावर पोस्ट करणा-याला शिवसैनिकांनी बेदम चोप दिला. त्यावर भाष्य करत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ठाकरे शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. कायदा हातात घेणे हे आपले काम नाही. पोलिसांचे काम आहे. त्यामुळे ट्रोल करणा-यांकडे दुर्लक्ष करुन शांत राहणे असा सल्ला आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला आहे.
ट्रोल करणा-यांकडे दुर्लक्ष करुन शांत राहणे हे आपले काम आहे. पोलिसांना त्यांचे काम करुन द्या. आपल्या देशात अशी हिंसा होणं ही कौतुकास्पद बाब नव्हे. यात आपल्या देशाचाच अपमान आहे.
हेदेखील वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध लिहिली आक्षेपार्ह पोस्ट; शिवसैनिकांनी घरात घुसून केली मारहाण व मुंडण
'आमचा उद्धेश ही आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करणे आहे. आमचा उद्देश तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणे जेणे करुन राज्याच्या अर्थव्यवस्थेला थोडा हातभार लागेल. त्यामुळे कोणावरही आरोप करण्याआधी त्याला चांगले काम करण्याची संधी द्या' अशा शब्दांत त्याले ट्विट केले आहे.
सध्या देशात नागरिकत्व कायद्याविरोधात (Citizenship Amendment Act) मोठे आंदोलन पेटले आहे. याचबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आपले मत व्यक्त केले होते. या वक्त्यव्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या एका व्यक्तीला शिवसैनिकांनी मारहाण करत सर्वांसमक्ष त्याचं मुंडण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राहुल उर्फ हिरामणी तिवारी असे या व्यक्तीचे नाव असून तो वडाळा येथील रहिवासी आहे. 19 डिसेंबर रोजी राहुलने मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. त्यानंतर काल दुपारी शिवसैनिकांनी या व्यक्तीचे मुंडण केले.