अभिनेत्री हेमा मालिनी आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी लॉन्च केला Delphic Council Of Maharashtra चा लोगो

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि भाजपच्या खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या उपस्थितीत आज राज भवनात डेल्फिक काउंसिल ऑफ महाराष्ट्राच्या (Delphic Council Of Maharashtra) अधिकृत लोगोचे अनावरण करण्यात आले.

Governor Bhagat Singh Koshyari | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari)  आणि भाजपच्या खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या उपस्थितीत आज राज भवनात डेल्फिक काउंसिल ऑफ महाराष्ट्राच्या (Delphic Council Of Maharashtra) अधिकृत लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी अभिनेते आणि भाजपचे माजी खासदार परेश रावल यांनी सुद्धा उपस्थिती लावली होती. अन्य कलाकारांमध्ये भाग्यश्री आणि तिचा पती हिमालय, प्रसिद्ध कोरियोग्राफर जोडी बॉस्को-सीजर, सलीम-सुलेमान फेम संगीतकार सुलेमान, अभिनेता श्रेयल तलपडे, उद्योगपती यश बिर्ला आणि महाराष्ट्र सरकार मधील काही अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यावेळी उपस्थिती लावली होती.

डेल्फिक काउंसिल ऑफ महाराष्ट्राचा लोगो 'पाणी' हा गेल्या काही काळापासून तोच कायम ठेवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय डेल्फिक काउंसिल एक गैर-सरकारी, बिगर-राजकीय, गैर-धार्मिक संस्था आहे. जगभरात याची ओळख कला आणि संस्कृतिचे पोषण करणारी संस्था म्हणून ओळखळी जाते.(Climate Fellowship Program 2021: महाराष्ट्र सरकारचा पर्यावरण आणि हवामान बदल विभागात इंटर्नशिप करण्याची संधी, जाणून घ्या कसा करता येईल अर्ज)

उल्लेखनीय आहे की, डेल्फिक गेम्सची सुरुवात 2500 वर्षांपूर्वी प्राचीन ग्रीस मध्ये झाली होती. त्याला ऑलिंम्पिक गेमप्रमाणे मानले जाते. ऑलिंम्पिकमध्ये शारिरीक खेळांचा समावेश असतो. तर डेल्फिक गेम्सची ओळख ही कला आणि सांस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. गेल्या काही वर्षात भारताने दक्षिण कोरिया आणि मलेशिया सारख्या काही देशात डेल्फिक गेम्समध्ये भाग घेत स्वर्ण ते रजत पदक जिंकली आहेत.(Maharashtra: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लिहलेल्या पत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया)

तसेच राज्यपाल कोश्यारी यांनी भारताला कलाप्रेमी देश आणि प्राचीन परंपरेचा हवाला देत देश हा कला-संस्कृतीला प्रोत्साहन देणारा असल्याचे म्हटले आहे. त्याचसोबत विविध कला-संस्कृती आणि खेळांना सुद्धा येथे प्रोत्साहन दिले जात असून भारत सरकार कडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांबद्दल ही कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.