भाजप पक्षासोबत हातमिळवणी करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई होणार- शरद पवार यांचा इशारा
तरीही भाजपाला पाठिंबा देण्यात आला आहे. तसेच प्रदेशाध्यक्षांचा आदेश नकारणाऱ्यांना नोटीस दिली असून पुढील पाच दिवसात कारवाई करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे.
भाजप (BJP) पक्षाला कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा द्यायचा नाही असे काँग्रेस (Congress) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना सांगितले होते.तरीही भाजपाला पाठिंबा देण्यात आला आहे. तसेच प्रदेशाध्यक्षांचा आदेश नकारणाऱ्यांना नोटीस दिली असून पुढील पाच दिवसात कारवाई करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे.
नगर येथे झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर येथील आमदार शरद पवार यांना भेटण्यास गेले होते. त्यावेळी त्यांना संपूर्ण माहिती परिस्थिती सांगत शिवसेनेबाबत ही सांगितले गेले. त्यावेळी आमदारांना पवार यांनी भाजप सोबत जायचे नाही असे स्पष्टपणे सांगितले होते. एवढे सांगूनही भाजपला पाठिंबा दिल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार यांना सांगितले आहे. त्यामुळे पुढील पाच दिवसात पक्षाची बैठक घेण्यात येणार असून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे.(हेही वाचा- अहमदनगर महापौर निवडणुकीदरम्यान श्रीपाद छिंदम यांना सेना नगरसेवकांकडून मारहाण)
नगर येथील पत्रकार परिषदेवेळी शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच देशाच्या महत्वाच्या संस्थांमध्ये सध्या गोंधळ चालू आहे. तर लोकांचा विश्वास असलेल्या संस्थांवर हल्ले होत असून सत्तेचा खूप अतिरेक होत आहे. त्यामुळे देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली गेली आहे.