Mumbai Shocking: PUBG खेळताना झाली ओळख, आरोपीने महिलेवर केला बलात्कार; गुन्हा दाखल

ज्यामुळे कलिना, सांताक्रूझ येथील सिंधीलच्या विरोधात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला.

Stop Rape (Representative image)

Mumbai Shocking: मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जिथे एका 33 वर्षीय महिलेने पोलिसांशी संपर्क साधला असून, लोकप्रिय ऑनलाइन गेम PUBG खेळत असताना भेटलेल्या एका व्यक्तीने तिच्यावर वारंवार बलात्कार (Rape) केल्याचा आरोप केला आहे. पंत नगर पोलिसांना दिलेल्या निवेदनानुसार, 2020 च्या शेवटी गेम खेळत असताना तिची ओळख आरोपीशी झाली. तेव्हापासून ते एकमेकांशी संवाद साधत होते. आरोपीने महिलेला लग्नाचे आश्वासन दिले आणि तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

सिंधील व्यंकटेश सूर्यवंशी असं या आरोपीचं नाव आहे. आरोपीने गेल्या अनेक वर्षांपासून पीडितेच्या विश्वासाचा गैरफायदा घेत तिच्याशी लग्न करण्याचे वारंवार आश्वासने दिली. या संपूर्ण कालावधीत, तो तिला विविध हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला, जिथे त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवताना खोटे आश्वासन देणे सुरूच ठेवले. (हेही वाचा - Crime News: लग्नाळू तरुणाचा महिलांच्या अंतर्वस्त्रांवर डल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद; आरोपीला नागरिकांकडून चोप)

दरम्यान, महिलेने असा दावा केला की. सिंधीलने केवळ तिच्यावर बलात्कार केला नाही तर तिच्या संमतीशिवाय गुप्तपणे तिचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. त्यानंतर त्याने कथितरित्या या व्हिडिओंचा वापर तिला धमक्या देण्यासाठी केला आणि तिच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती केली. सिंधीलने आपल्या वचनांचे पालन करण्यास नकार दिला आणि लग्नाची कोणतीही वचनबद्धता स्पष्टपणे नाकारली.

पीडित महिलेने शुक्रवारी दुपारी पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांना वेदनादायक घटना सांगितली. ज्यामुळे कलिना, सांताक्रूझ येथील सिंधीलच्या विरोधात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला. मात्र, पोलीस त्याला पकडण्यासाठी गेले असता तो कुठेच सापडला नाही. सध्या तो फरार समजला जात असून पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आरोपीता शोध सुरू करण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सिंधील सूर्यवंशी विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार), 376 (एन) (2) (लग्नाच्या आश्वासनावर शारीरिक संबंध ठेवणे) आणि 420 (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.