Eknath Shinde: नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाला अपघात; अंगठ्याला दुखापत झाल्याची माहिती समोर

वाशी टोळनाक्याजवळ हा अपघात घडला आहे.

Eknath Shinde (Photo Credits: IANS)

महाराष्ट्राचे नगरविकास तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) याच्या वाहनाला अपघात (Car Accident) झाला आहे. वाशी टोळनाक्याजवळ (Vashi Toll Naka) हा अपघात घडला आहे. तसेच या अपघातात त्यांच्या अंगठ्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात घडला आहे. या अपघाताची माहिती होताच त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झाले होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या अंगठ्याची दुखापत वगळता त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे कळत आहे. यासंदर्भात टीव्ही9ने वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आपल्या टोयटा एसयूव्ही गाडीने मुंबईला चालले होते. मात्र, वाशी टोलनाका ओलांडल्यानंतर त्यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी दुर्घटना घडली असून एकनाथ शिंदेच्या अंगठ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान, गाडीच्या पुढच्या भागाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. एकनाथ शिंदे यांची प्रकृती आता उत्तम आहे व काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे. हे देखील वाचा- Shiv Sena On Farmers Protest: खोटे गुन्हे दाखल करून बळीराजाचा संघर्ष मिटवता येणार नाही- शिवसेना

पीटीआयचे ट्विट-

याआधी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या जीवास धोका होण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर करण्यात आल्याचे समोर आले होते. एकनाथ शिंदे यांच्या फोटो समोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू , सफेद कोंबडा यांचा वापर करून अघोरी जादूटोणा करणारे दोघांना स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली आहे.