Nagpur Accident: गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या कारचा अपघात, पाच जणांना उडवलं, अल्पवयीन मुलासह दोघांवर गुन्हा दाखल
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Nagpur Accident: नागपूरमध्ये एका कारने पाच जणांना उडवल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर पुण्यातील पोर्श अपघात (Pune Porsche Accident) प्रकरणाची आठवण करून दिली आहे. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहे. संतापजनक म्हणजे कार चालक अल्पवयीन असल्याची माहिती मिळत आहे.( हेही वाचा- विहिरीत पोहताना विजेचा धक्का लागून 15 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, तिघांवर गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील केडीके चौकात भरधाव कार अनियंत्रित झाली आणि त्यानंतर पाच जणांना धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, रत्याच्या कडेला असलेला भाजीपाला स्टॉल उडवला. कार चालकाने टर्न घेताना ब्रेक मारल्या ऐवजी एक्सिलेटरवर पाय पडला. कार पुढे जाऊन अनियंत्रित झाली आणि भाजीपाला दुकानाला उडवले. यात दोन दुकानदार आणि तीन ग्राहक गंभीर जखमी झाले
पोलिसांनी सांगितले की, वाडोठी परिसरातील गॅरेजमध्ये काम करत असलेला अल्पवयीन मुलगा कार चालवत होता. दुरुस्तीसाठी आलेली कार पार्क करण्यासाठी रस्त्यावर आणली. तेवढ्यात ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर रस्त्यावर गोंधळ निर्माण झाला होता. ही घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
गॅरेज मालक, अल्पवयीन मुलगा आणि कार मालक यांच्यावर नंदनवन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. घटनेचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे.