Accident In Sambhajinagar: मद्यधुंद कार चालकाची चार दुचाकींना धडक, आरोपी फरार, छत्रपती संभाजीनगर येथील घटना

पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात अद्याप शांत झालेले नाही. त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका मद्यधुंद कार चालकाने भरधाव वेगात चार दुचाकाींना धडक दिली.

Accident In Sambhajinagar: मद्यधुंद कार चालकाची चार दुचाकींना धडक, आरोपी फरार, छत्रपती संभाजीनगर येथील घटना
Accident in sambhaji nagar pc twitter

 Accident In Sambhajinagar: पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात अद्याप शांत झालेले नाही. त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका मद्यधुंद कार चालकाने भरधाव वेगात चार दुचाकाींना धडक दिली. त्यानंतर कार थेट हॉटेलवर धडकली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातानंतर अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. (हेही वाचा- राजस्थानमध्ये वेगवान कारची उंटाला धडक; काच फोडून उंट थेट कारमध्ये)

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथे कारच्या धडकेत दुचाकींचा अपघात झाला. ही घटना शिवाजी नगर संकुल परिसरात झाली आहे.  कार चालक मद्यधुंद अवस्थेत कार चालत होता अशी माहिती समोर आली आहे. कार चालकाने भरधाव वेगात चार दुचाकींना धडक दिली होती. त्यानंतर कार थेट हॉटेलला धडकली. हॉटेलमध्ये ठेवलेली वाहने व टेबल पुर्णपण उध्वस्त झाले आहे.

धक्कादायक म्हणजे चालक गाडीतून बाहेर आणि त्यानंतर गाडीच्या दोन्ही नंबर प्लेट तोडून घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही.  पोलिसांनी कार जप्त केली. कारमध्ये ठेवलेले कागदपत्रांच्या आधारे चालकाचा शोध सुरु आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहे. या अपघातानंतर नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळ उडाला होता.

(The above story first appeared on LatestLY on Jun 09, 2024 02:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).