Accident in Pune: पुणे येथील नवले पूल जवळ ट्रकचा ब्रेक फेल, भीषण अपघातात तीन ठार

तर पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना मुंबई-बंगळुरु महामार्गावर नवले पूल (Navale Bridge) येथे सकाळी सात वाजणेच्या सुमारास घडली. डिझेल संपलेला ट्रक रस्त्याच्या मध्यभागी उभा होता. हा ट्रक डिझेल भरुन सुरु करत असताना ब्रेक फेल झाल्याने हा अपघात (Accident in Pune) घडला.

Road Accident | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

पुणे (Pune) येथे भीषण अपघातात तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना मुंबई-बंगळुरु महामार्गावर नवले पूल (Navale Bridge) येथे सकाळी सात वाजणेच्या सुमारास घडली. डिझेल संपलेला ट्रक रस्त्याच्या मध्यभागी उभा होता. हा ट्रक डिझेल भरुन सुरु करत असताना ब्रेक फेल झाल्याने हा अपघात (Accident in Pune) घडला. ब्रेक फेल झाल्याने ट्रक तब्बल ताशी 70 किलोमीटर वेगाने रिव्हर्स गेला आणि हा अपघात घडला. ट्रकने पाठीमागे उभा असलेल्या दोन-तीन वाहनांना धडक दिली. ट्रकने काही दुचाकीही चिरडल्या.

ट्रकने रिव्हर्स जात ज्या कारला धड दिली त्यात दिल्लीहून महाबळेश्वरला फिरायला आलेल्या कुटुंबाचा समावेश होता. हे लोक महाबळेश्वरला निघाले होते. दुसऱ्या कारमध्ये एक नवदाम्पत्य होते. हे दाम्पत्य कोल्हापूरला देवदर्शनासाठी निघाले होते. या घटनेत हे लोक किरकोळ जखमी झाले आहेत. तर तिसऱ्या कारमध्ये भोसरीहून सातारला निघालेला नागरिक होता. (हेही वाचा, Pune Road Accident: पुण्याजवळ महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात; 3 ठार, 8-10 जण जखमी)

नवले पूल हा पाठिमागील काही दिवसांपासून अपघाताचे केंद्र बनला आहे. या आधी 5 नोव्हेंबर रोजी याच पुलावर अपघात घडला होता. या अपघातामध्ये कोणाचाही मृत्यू झाला नव्हता. मात्र, वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. असाच अपघात पुणे-बंगळुरु महामार्गावर 29 ऑक्टोबर रोजी नऱ्हे सेल्फी पॉइंटजवळ घडला. हायवेवरुन धावत असलेला एक कंटेनर थेट सर्व्हिस रोडवरील हॉटेलला धडकला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली होती.



संबंधित बातम्या