IPL Auction 2025 Live

Abdul Sattar Obscene Language Video: गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात पोलिसांना अश्लील भाषेत जाहीर आदेश, मंत्री अब्दुल सत्तार नव्या वादात (Watch Video)

ही घटना सिल्लोड येथे घडली आहे. या प्रकाराचा एक व्हिडिओही (Abdul Sattar uses Obscene Language) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Abdul Sattar And Gautami Patil | (Photo credit: archived, edited, representative image)

गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या कार्यक्रमात मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी अश्लील भाषा वापरत दिलेल्या आदेशावरुन पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. ही घटना सिल्लोड येथे घडली आहे. या प्रकाराचा एक व्हिडिओही (Abdul Sattar uses Obscene Language) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सरकारमधील आणि पक्षातील एका जबाबदार लोकप्रतिनीधीमध्ये इतका उद्दामपणा येतोच कुठून, असा सवाल निर्माण झाला आहे. या मंत्री महोदयांची अश्लील आणि वादग्रस्त भाषा वापरण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता.

''इतके मारा की, त्यांच्या ढुंगxची हड्डी तुटली पाहिजे''

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात अब्दुल सत्तार हे जाहीर व्यासपीठावरुन उपस्थित जनसमुदयासमोर शिवीगाळ करत आहेत. यातील काही वाक्ये तर इतकी आक्षेपार्ह आहेत की, ती जाहीरपणे सांगण्याच्या लायकही नाहीत. ही भाषा वापरत असतानाच ते पोलिसांनाही आदेश देत आहेत. ''उभे असलेल्या आणि कार्यक्रमात उल्लडबाजी करणाऱ्यांना कोठीने चोपून काढा. त्यांना इतके मारा इतके मारा की, त्यांच्या ढुंगxची हड्डी तुटली पाहिजे'', अशी विधाने करताना सत्तार आढळून येत आहेत. आदेश मिळताच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनीही मग कोणतीही कस न ठेवता उपस्थितीतांपैकी काहींना चांगलाच चोप दिल्याचे समजते. घडल्या प्रकारावरुन राजकारण तापू लागले आहे. विरोधकांनीही या वर्तनावर जोरदार टीका केली आहे. (हेही वाचा, Abdul Sattar Controversy: अब्दुल सत्तार पुन्हा वादात; पाच जणांवर गुन्हा दाखल, सिल्लोड येथील घटना)

सत्तार म्हणाले, तुझ्या आई-बापाचा पिक्चर पाहतो काय?

''हे नौटंकी लोक जे आहेत ते फक्त नाटक करतात. त्यांना कुत्र्यासारखं मारा. जे गद्दार असंन.. जे केवळ धिंगाना घालण्यासाठी कार्यक्रमात येतात त्यांना मारा. खाली बसा.. हे पुढचं जे आहे ना त्याला पहिलं मारा... ऐ पोलिसांनो त्यांना लाठीचार्ज करा.. त्या मागच्या लोकांना लाठीचार्ज झाला पाहिजे. त्यांना इतकं मारा की दोन मिनिटांत त्यांच्या गांxची हड्डी तुटून जाईल. हाणा त्यांना.. हाणा. ये खाली बैस... तुझ्या बापाने पाहिला होता का कार्यक्रम? माणसाची औलाद आहे माणसासारखं वागा... ऐ पोलीस.. एक हजार पोलीस आहेत.. हाणा यांना पंधरा-सोळा लोकांना... काय फरक पडतो. ये खाली बस... काय तुझ्या आई-बापाचा पिक्चर पाहतो काय? एका बापाची आणि आईबापाची औलाद असेल तर खाली बसा. नाहीतर निघून जा.. मी बोलावले होते का तुम्हाला?'' (हेही वाचा, Gautami Patil New Video: गौतमी पाटील म्हणते 'अहो पाव्हणं.. चिज मी लई कडक')

व्हिडिओ

चौफेर टीकेनंतर खेद

दरम्यान, चौफेर टीका झाल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी घडल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला आहे. त्या कार्यक्रमात मी तसे बोललो नसतो तर मोठा अनर्थ घडला असता. त्यामुळे मला तसे बोलावे लागले. घडल्या प्रकाराबद्दल कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो, अशी सारवासारव त्यांनी केली आहे.